पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली दिल्ली स्फोटातील जखमींची विचारपूस

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
19 mins ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली दिल्ली स्फोटातील जखमींची विचारपूस

नवी दिल्ली :  दिल्लीतील लाल किल्ला (Delhi Red Fort) परिसरात कारमध्ये झालेल्या स्फोटात (Blast in Car) जखमी झालेल्यांची पंतप्रधान नरेंद मोदी (Prime Minister Narendra Modi)  यांनी येथील एलएनजेपी हॉस्पिटलात (LNJP Hospital) जाऊन विचारपूस केली. सर्वजण लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली.

स्फोट घडवून आणलेल्यांना शिक्षा केली जाईल व स्फोटात ठार झालेले व जखमी झालेल्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल असे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी सांगितले. 

लाल किल्ला परिसरात सोमवारी झालेल्या विनाशकारी बॉंबस्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला तर २० जण जखमी झाले होते. त्यामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीसहीत देशभर ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद मोदी भूतानचा दोन दिवसांचा दौरा आटपून भारतात परतले. त्यानंतर एलएनजेपी हॉस्पिटलात जाऊन जखमी झालेल्यांची विचारपूस केली व त्यांच्या कुटुंबियांसोबत काही वेळ घालवला. नंतर आपत्कालीन सुरक्षा बैठकीला उपस्थित राहिले. 

शहरात कडेकोट बंदोबस्त 

सोमवारी रात्रीपासून दिल्ली एका किल्ल्यासारखे झाले आहे. सर्व प्रमुख चौक, मेट्रो स्टेशन आणि महामार्गांवर मोठ्या प्रमाणात सशस्त्र दिल्ली पोलिस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या किंवा बाहेर पडणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. आणि अनेक जिल्ह्यांमध्ये शोध मोहीम सुरू आहे. लाल किल्ला मेट्रोजवळील ट्रॅफिक सिग्नलवर एका हुंडई आय २० कारमध्ये हा स्फोट झाला होता. 


हेही वाचा