टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील तिन्ही संशयित शूटरना अटक

कोटा रेल्वे स्थानकावर राजस्थान एजीटीएफने सापळा रचून पकडले; बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या गाडीवर झालेल्या गोळीबार प्रकरणातील तिन्ही संशयित शूटरना राजस्थानमधील कोटा रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली आहे. राजस्थानच्या अँटी-गँगस्टर टास्क फोर्स (एजीटीएफ) आणि कोटा शहर पोलिसांनी मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही संयुक्त कारवाई केली. तिन्ही संशयित पुणे-जयपूर एक्स्प्रेसमधून प्रवास करत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. (Three shooters allegedly involved in the assassination attempt on Bollywood actor Tiger Shroff have been caught at Rajasthan's Kota railway station while travelling by train.)

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील तिन्ही संशयित शूटरना अटक

कोटा : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या गाडीवर झालेल्या गोळीबार प्रकरणातील तिन्ही संशयित शूटरना राजस्थानमधील कोटा रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली आहे. राजस्थानच्या अँटी-गँगस्टर टास्क फोर्स (एजीटीएफ) आणि कोटा शहर पोलिसांनी मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही संयुक्त कारवाई केली. तिन्ही संशयित पुणे-जयपूर एक्स्प्रेसमधून प्रवास करत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. (Three shooters allegedly involved in the assassination attempt on Bollywood actor Tiger Shroff have been caught at Rajasthan's Kota railway station while travelling by train.)

संशयितांपैकी दोघे हरियाणातील असून, तिसरा बिहार किंवा महाराष्ट्रमधील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. संश‌िियतांपैकी दोघांनी गोळीबार केला, तर तिसऱ्याने हल्ल्यानंतर त्यांना पळून जाण्यास मदत केल्याचा संशय आहे. याप्रकरणी एका अल्पवयीनाचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

हल्ल्यापूर्वी टायगरच्या हालचालींवर लक्ष

मुंबईतील जुहू परिसरात रविवारी संध्याकाळी टायगर श्रॉफच्या गाडीला लक्ष्य करून गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत अभिनेता सुरक्षित बचावला; मात्र त्याचा चालक आणि अन्य एक व्यक्ती जखमी झाले.

तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी हल्ल्यापूर्वी टायगरच्या हालचालींची रेकी केली होती. अभिनेता दर रविवारी जुहू येथील फुटबॉल मैदानावर जात असल्याची माहिती संशयितांना होती. मैदानातून कारने बाहेर पडताना त्याला लक्ष्य करण्यात आले.

गोळीबारानंतर संशयितांनी विलेपार्ले आणि अंधेरीमार्गे पळ काढला. त्यांनी अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ दुचाकी सोडून बोरिवलीच्या दिशेने रेल्वेने प्रवास सुरू केला. त्यानंतर महाराष्ट्राची सीमा ओलांडून गुजरातमध्ये जाण्याचा प्रयत्न केल्याची माहितीही तपास यंत्रणांना मिळाली होती.

उपमुख्वमंत्री शिंदे यांचा कठोर कारवाईचा इशारा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री टायगर श्रॉफच्या वांद्रे येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यांनी अभिनेत्याच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच त्याच्या कुटुंबीयांना योग्य सुरक्षा पुरवण्याचे आश्वासन दिले होते.

मुंबईत टोळीयुद्ध आणि गुन्हेगारीला थारा दिला जाणार नाही, असा इशाराही शिंदे यांनी दिला होता. या गोळीबारामागील संशयितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला आहे. मात्र, या पोस्टची सत्यता पोलिसांनी अद्याप पडताळलेली नाही. संशयितांच्या अटकेनंतर या हल्ल्यामागील नेमका हेतू आणि कटात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.

हेही वाचा
सर्व पहा