अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली भेट

आरोपींवर करणार कडक कारवाई : शिंदे; श्रॉफच्या हात, खांदा आणि छातीवर पट्ट्या; बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याच्यावर मुंबईतील जुहू परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर त्याचे पहिले फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये टायगरच्या हातावर, खांद्यावर आणि छातीवर वैद्यकीय पट्ट्या व ड्रेसिंग केलेले दिसत आहे. या घटनेत टायगर बचावला असून, त्याच्या चालकाला दुखापत झाली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी टायगरच्या निवासस्थानी जाऊन त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या घटनेबद्दल चिंता व्यक्त करत त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
7 hours ago
अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली भेट

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff)  यांच्यावर मुंबईतील जुहू परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर त्याचे पहिले फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये टायगरच्या हातावर, खांद्यावर आणि छातीवर वैद्यकीय पट्ट्या व ड्रेसिंग केलेले दिसत आहे. या घटनेत टायगर बचावला असून, त्याच्या चालकाला दुखापत झाली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी टायगरच्या निवासस्थानी जाऊन त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या घटनेबद्दल चिंता व्यक्त करत त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी या हल्ल्यात पाच गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगितले. सुदैवाने टायगर सुरक्षित बचावला; मात्र या घटनेमुळे तो आणि त्याची आई घाबरले असल्याचेही त्यांनी नमूद केले. “ही एक गंभीर घटना आहे. पाच गोळ्या झाडण्यात आल्या; मात्र सुदैवाने तो सुरक्षित आहे,” असे शिंदे म्हणाले.

धमक्यांना थारा देणार नाही : शिंदे

टायगर आणि त्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारचा पूर्ण पाठिंबा असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक व्यक्तींना उघडपणे धमक्या देण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. या प्रकरणातील दोषींना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी कुटुंबीयांना दिले. मुंबईत यापूर्वी झालेल्या टोळीयुद्धांचा उल्लेख करत शिंदे यांनी अशा गुन्हेगारी प्रवृत्तींवर सरकार कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

जुहू गोळीबारप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू

या गोळीबारासाठी वापरल्याचा संशय असलेली दुचाकी पोलिसांनी (Mumbai Police) शोधून काढल्याने तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई गॅंगने घेतली आहे. सलमान खानबरोबरच चित्रपटांत काम करणाऱ्यांची अशीच गत केली जाणार असल्याचा इशारा बिश्नोई गॅंगच्या काहीजणांनी सोशल मिडियावर व्हिड‌िओ जारी करून केली आहे.

हेही वाचा
सर्व पहा