श्री काशी विश्वनाथ मंदिरातील कळसावरील सोने गायब? : मंदिर ट्रस्ट म्हणते अफवा

खराब झालेला कळस मंदिराच्या लॉकरमध्ये सुरक्षित; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन : वाराणसी येथील श्री काशी विश्वनाथ मंदिरातील सोने गायब झाल्याचे वृत्त पसरल्याने प्रचंड खळबळ माजली होती. तसेच मंदिराच्या संरचनेला नुकसान झाल्याची माहिती पुढे आली होती. मात्र, हे दोन्ही दावे पूर्णपणे निराधार आणि दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट करत मंदिर ट्रस्टने या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. मंदिराचा खराब झालेला कळस सुरक्षितपणे मंदिराच्या लॉकरमध्ये ठेवल्याचे श्री काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
श्री काशी विश्वनाथ मंदिरातील कळसावरील सोने गायब? : मंदिर ट्रस्ट म्हणते अफवा

वाराणसी : येथील श्री काशी विश्वनाथ मंदिरातील सोने गायब झाल्याचे वृत्त पसरल्याने प्रचंड खळबळ माजली होती. तसेच मंदिराच्या संरचनेला नुकसान झाल्याची माहिती पुढे आली होती. मात्र, हे दोन्ही दावे पूर्णपणे निराधार आणि दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट करत मंदिर ट्रस्टने या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. मंदिराचा खराब झालेला कळस सुरक्षितपणे मंदिराच्या लॉकरमध्ये ठेवल्याचे श्री काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

श्री काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टने मंदिरातील सोन्याबाबत आणि मंदिराच्या वास्तूच्या स्थितीबाबत पसरवल्या जाणाऱ्या चर्चांवर स्पष्टीकरण दिले आहे. मंदिरातील सोने गायब झाल्याचा दावा तसेच मंदिराच्या संरचनेचे नुकसान झाल्याच्या बातम्या वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचे ट्रस्टने म्हटले आहे.

या अफवांमुळे भाविकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असल्याने ट्रस्टने अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे. मंदिरासंदर्भातील कोणतीही माहिती प्रसारित करण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पाहावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. श्री काशी विश्वनाथ मंदिर हे देशातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे. येथे दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे मंदिराबाबत चुकीची माहिती पसरू नये, यासाठी ट्रस्टने अफवांचे खंडन करत वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे.

खराब झालेला कळस सुरक्षितपणे लॉकरमध्ये

मंदिराचा खराब झालेला कळस सुरक्षितपणे मंदिराच्या लॉकरमध्ये ठेवल्याचे श्री काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. कळसाचे संवर्धन आणि दुरुस्ती करण्यासाठी आयआयटी मद्रासच्या तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. कळसाची सुरक्षितता आणि त्याचे योग्य पद्धतीने जतन करण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक कामे केली जात आहेत.

दरम्यान, कळसावरील सोने गायब झाल्याबाबत पसरवण्यात येणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. 

हेही वाचा
सर्व पहा