राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर दलालांचा सुळसुळाट

कळंगुट परिसरात दोन दिवसांत १३ दलालांना अटक; गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर (Goa beaches) दलालांचा सुळसुळाट झालाआहे. या दलालांकडून पर्यटकांची सतावणूक करण्याच्याही घटना वाढत आहेत. पर्यटन खात्याने याची दखल घेऊन पोलिसांकडे तक्रार करून पर्यटकांना सतावणारे दलाल व संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर (Calangute beach) गेल्या दोन दिवसांत एकूण १३ दलालांवर कारवाई करत त्यांना अटक केली आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर दलालांचा सुळसुळाट

पणजी : गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर (Goa beaches)  दलालांचा सुळसुळाट झालाआहे. या दलालांकडून पर्यटकांची सतावणूक करण्याच्याही घटना वाढत आहेत. पर्यटन खात्याने याची दखल घेऊन पोलिसांकडे तक्रार करून पर्यटकांना सतावणारे दलाल व संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर (Calangute beach) गेल्या दोन दिवसांत एकूण १३ दलालांवर कारवाई करत त्यांना अटक केली आहे.

समुद्रकिनाऱ्यांवरील दलालांची वाढती संख्या व पर्यटकांना केला जाणारा उपद्रव यासंदर्भात पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनीही रोष व्यक्त केला होता. कारवाई करण्याची सूचना पोलीस अधिकाऱ्यांना केली होती. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची काही दलालांकडून दिशाभूल केली जात होती. आपल्या फायद्यासाठी चुकीची माहिती देऊन पैसेही उकळले जात होते. त्यामुळे पर्यटकांची फसवणूक होत असल्याची व त्यामुळे गोव्यातील पर्यटनाला गालबोट लागत असल्याच्या वाढत्या तक्रारी होत्या. काही पर्यटक दलालांकडून फसवणूक झाल्यावर त्याचे व्हिडिओ काढून सामाजिक माध्यमांवर टाकतात. त्यामुळे देशविदेशातही गोव्यातील पर्यटनाची नाहक बदनामी होत असल्याच्या वाढत्या तक्रारी होत्या.

यापार्श्वभूमीवर पर्यटकांची सतावणूक करणारे दलाल व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत होती. त्यातूनच वरील कारवाई करण्यात येत आहे. कळंगुट पोलिसांनी (Calangute Police) कारवाई करताना गेल्या दोन दिवसांत १३ दलालांना अटक केली आहे. भारतीय नागरीक सुरक्षा संहितेच्या (बीएनएसएस) कलम १२६/१७० कलमान्वये तक्रार नोंदवून अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्यांत गोव्याबाहेरील अनेकांचा समावेश आहे. त्यात तपन समल (बार्देश, मूळ ओडिशा), प्रशांत सिंग (बार्देश, मूळ उत्तर प्रदेश), अफताब खान (कळंगुट, बार्देश, मूळ उत्तर प्रदेश), अजित कुमार राय (कळंगुट, बार्देश, मध्यप्रदेश), शेख वजीर (कळंगुट, बार्देश, पश्च‌िम बंगाल), पचरला लक्ष्मी साई अभिनेय (कळंगुट, बार्देश, आंध्रप्रदेश), साईराज हैदर अली (कळंगुट, बार्देश, उत्तर प्रदेश), सिगमंट सिल्वेरा (कांदोळी, बार्देश, गोवा), विकास यादव (कांदोळी, गोवा), विल्फ्रेड गोन्साल्वीस (कांदोळी, गोवा), पी. बी. नाईक (कांदोळी, गोवा) कृष्ण कुमार खरवार (उत्तर प्रदेश), श्रीनिवास लमाणी (उत्तर गोवा) यांचा समावेश आहे. 

हेही वाचा
सर्व पहा