कुडचडे : कुडचडे रेल्वे स्थानकावर गुरुवारी रेल्वेची धडक बसल्याने एका अनोळखी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि कुडचडे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, तिची ओळख निश्चित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सदर व्यक्ती रेल्वे गाडीच्या खाली कसा आला आणि कोणत्या परिस्थितीत त्याला धडक बसली याचा शोध पोलीस घेत आहेत. अधिक तपास पोलीस करीत आहेत.


