वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील रिक्त पदांसाठी नोकरभरती जाहीर

गोव्यात आरोग्य, वैद्यकीय शिक्षण व अभियांत्रिकी क्षेत्रात विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून, पात्र उमेदवारांनी २३ ऑक्टोबरपर्यंत आपले अर्ज सादर करावेत.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
3 hours ago
वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील रिक्त पदांसाठी नोकरभरती जाहीर

पणजी : गोव्यातील विविध सरकारी खात्यांमध्ये रिक्त असलेली पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी आणि तांत्रिक सेवा यांसारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेत थेट नियुक्तीसह प्रतिनियुक्तीच्या (Deputation) माध्यमातूनही काही पदे भरली जाणार आहेत.


आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणावर तज्ज्ञांची पदे भरली जाणार आहेत. यामध्ये नर्सिंग शिक्षण क्षेत्रात 'मेडिकल सर्जिकल नर्सिंग' आणि 'मिडवाइफरी अँड ऑब्स्टेट्रिकल नर्सिंग' या विषयांसाठी असोसिएट प्रोफेसरच्या प्रत्येकी १ पदाचा समावेश आहे. या पदांसाठी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (M.Sc Nursing) आणि किमान ५ ते १० वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असणे आवश्यक आहे. याशिवाय वैद्यकीय विभागात गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, कार्डियाक ॲनेस्थेशिओलॉजी आणि फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन या विभागांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांची (Assistant Professor) पदे भरली जाणार आहेत. तसेच बायोकेमिस्टच्या २ जागांसाठीही अर्ज मागवण्यात आले आहेत. या सर्व पदांसाठी संबंधित विषयातील पदव्युत्तर वैद्यकीय पदवी, अनुभव आणि कोकणी भाषेचे ज्ञान असणे बंधनकारक करण्यात आले आहे.


क्र.पदाचे नावएकूण जागा पात्रता व अनुभव अर्ज करण्याची अंतिम मुदत
१असोसिएट प्रोफेसर (मेडिकल सर्जिकल नर्सिंग)१ संबंधित विषयात ५५% गुणांसह एम.एससी. नर्सिंग (M.Sc. Nursing), किमान १० वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आणि कोकणी भाषेचे ज्ञान.२३ ऑक्टोबर २०२६
२असोसिएट प्रोफेसर (मिडवायफ्री अँड ऑब्स्टेट्रिकल नर्सिंग)१ संबंधित विषयात ५५% गुणांसह एम.एससी. नर्सिंग (M.Sc. Nursing), किमान १० वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आणि कोकणी भाषेचे ज्ञान.२३ ऑक्टोबर २०२६
३वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) (प्रतिनियुक्तीद्वारे)२ आरोग्य सेवा संचालनालय किंवा गोवा मेडिकल कॉलेजमधील समकक्ष पदावरील अधिकारी.२५ ऑक्टोबर २०२६
४सहाय्यक अभियंता - इलेक्ट्रिकल (प्रतिनियुक्तीद्वारे)१ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी, दंत यंत्रसामग्री दुरुस्ती व देखभालीचा ३ वर्षांचा अनुभव किंवा समकक्ष पदावरील ३ वर्षांची नियमित सेवा.२५ ऑक्टोबर २०२६
५सहाय्यक प्राध्यापक (रेडिओ डायग्नोसिस) (प्रतिनियुक्तीद्वारे)५ केंद्र/राज्य शासन किंवा केंद्रशासित प्रदेश प्रशासनातील समकक्ष पदावरील अधिकारी.२५ ऑक्टोबर २०२६
६सहाय्यक प्राध्यापक (मेडिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी)२ (१ सर्वसाधारण, १ इतर मागासवर्ग - OBC)संबंधित विषयातील पदव्युत्तर वैद्यकीय पदवी (MD/DNB/DM) आणि १ वर्षाचा अनुभव. (कोकणी भाषेचे ज्ञान आवश्यक, मराठी ऐच्छिक).२३ ऑक्टोबर २०२६
७सहाय्यक प्राध्यापक (सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी)१ संबंधित विषयातील पदव्युत्तर वैद्यकीय पदवी (MS/DNB/M.Ch) आणि १ वर्षाचा अनुभव. (कोकणी भाषेचे ज्ञान आवश्यक, मराठी ऐच्छिक).२३ ऑक्टोबर २०२६
८सहाय्यक प्राध्यापक (कार्डियाक ॲनेस्थेशिओलॉजी)४ (१ सर्वसाधारण, १ OBC, १ ST, १ EWS)संबंधित विषयातील पदव्युत्तर वैद्यकीय पदवी (MD/DNB/DM) आणि १ वर्षाचा अनुभव. (कोकणी भाषेचे ज्ञान आवश्यक, मराठी ऐच्छिक).२३ ऑक्टोबर २०२६
९सहाय्यक प्राध्यापक (फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन)१ (दिव्यांग प्रवर्ग)संबंधित विषयातील पदव्युत्तर वैद्यकीय पदवी आणि व्याख्याता म्हणून किमान ३ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव. (कोकणी भाषेचे ज्ञान आवश्यक).२३ ऑक्टोबर २०२६
१०बायोकेमिस्ट (Biochemist)२ (१ सर्वसाधारण, १ इतर मागासवर्ग)बायोकेमिस्ट्री (Bio-chemistry) विषयात एम.एससी. (M.Sc.) पदवी आणि कोकणी भाषेचे ज्ञान.२३ ऑक्टोबर २०२६
११वरिष्ठ तांत्रिक परीक्षक (Senior Technical Examiner) (प्रतिनियुक्तीद्वारे)१ सिव्हिल किंवा कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग पदवी, समकक्ष पदावरील अधिकारी किंवा L-11 वेतनश्रेणीत ५ वर्षांची नियमित सेवा.२३ नोव्हेंबर २०२६
१२तांत्रिक परीक्षक (Technical Examiner) (प्रतिनियुक्तीद्वारे)२ सिव्हिल किंवा कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग पदवी, समकक्ष पदावरील अधिकारी किंवा L-10/L-8/L-7 श्रेणीतील सेवा अनुभव.२३ नोव्हेंबर २०२६

दुसऱ्या टप्प्यात प्रतिनियुक्तीच्या (Deputation) तत्त्वावर काही महत्त्वाची पदे भरण्यात येत आहेत. यामध्ये संचालनालय स्तरावर वैद्यकीय अधिकाऱ्यांची (Medical Officer) २ पदे, सार्वजनिक बांधकाम किंवा संबंधित विभागात सहाय्यक अभियंता (इलेक्ट्रिकल) १ पद आणि रेडिओ डायग्नोसिस विभागात सहाय्यक प्राध्यापकांची ५ पदे प्रतिनियुक्तीने भरली जाणार आहेत. तांत्रिक परीक्षण विभागामध्ये वरिष्ठ तांत्रिक परीक्षक (Senior Technical Examiner) १ पद आणि तांत्रिक परीक्षक (Technical Examiner) २ पदांचा समावेश आहे. या तांत्रिक पदांसाठी स्थापत्य (Civil) किंवा बांधकाम अभियांत्रिकीतील पदवी असणे आवश्यक आहे.

या भरती प्रक्रियेत अर्ज सादर करण्यासाठी दोन वेगवेगळ्या अंतिम मुदती देण्यात आल्या आहेत. थेट भरती आणि वैद्यकीय क्षेत्रातील बहुतांश पदांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २३ ऑक्टोबर २०२६ ही आहे. तर प्रतिनियुक्तीद्वारे भरल्या जाणाऱ्या तांत्रिक परीक्षक आणि वरिष्ठ तांत्रिक परीक्षक या पदांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २३ नोव्हेंबर २०२६ ही ठेवण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी मुदतीपूर्वी आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.