गोवा पुनर्वसन मंडळ भरती २०२६; एमटीएस, टेक्निशियन, एलडीसीसह इतर रिक्त पदांसाठी ऑफलाइन अर्ज करा

गोवा पुनर्वसन मंडळात आर्किटेक्ट, अभियंता, लिपिक, ड्रायव्हर आणि एमटीएससह विविध पदांची नियमित भरती सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांनी १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
01st October, 12:46 pm
गोवा पुनर्वसन मंडळ भरती २०२६; एमटीएस, टेक्निशियन, एलडीसीसह इतर रिक्त पदांसाठी ऑफलाइन अर्ज करा

पणजी :  गोवा पुनर्वसन मंडळात (Goa Rehabilitation Board) विविध रिक्त पदांवर नियमित तत्त्वावर भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत आर्किटेक्ट, सहाय्यक अभियंता (सिव्हिल), कनिष्ठ अभियंता (सिव्हिल व इलेक्ट्रिकल), सुपरवायझर, ड्राफ्ट्समन, तंत्रज्ञ, लघू टंकलेखक/लिपिक (LDC), मल्टिटास्किंग स्टाफ (MTS) आणि ड्रायव्हर (LMV) अशा विविध पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवारांपासून ते अभियांत्रिकी पदवीधारकांपर्यंत सर्वांसाठी ही एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

अ. क्र.पद (Position)एकूण जागाशैक्षणिक पात्रतानियुक्तीचे स्वरूप / स्थान
१आर्किटेक्ट (Architect)०१B.Arch, काउंसिल नोंदणी व ३ वर्षे अनुभवनियमित 
२सहाय्यक अभियंता - सिव्हिल०१B.E. (Civil) व ३ वर्षे अनुभवनियमित 
३कनिष्ठ अभियंता - सिव्हिल०१Degree / Diploma (Civil) व २ वर्षे अनुभवनियमित
४कनिष्ठ अभियंता - इलेक्ट्रिकल०१Degree / Diploma (Electrical) व २ वर्षे अनुभवनियमित 
५सुपरवायझर (Supervisor)०१Degree / Diploma (Civil) व १ वर्ष अनुभवनियमित
६ड्राफ्ट्समन (Draughtsman)०१Degree / Diploma (Civil), AutoCAD व १ वर्ष अनुभवनियमित 
७तंत्रज्ञ (Technician)०२SSC + ITI (Electrical / Plumber) व १ वर्ष अनुभवनियमित 
८कनिष्ठ लिपिक (LDC)०३१२ वी / डिप्लोमा, संगणक टायपिंग (30 wpm)नियमित
९मल्टिटास्किंग स्टाफ (MTS)०११० वी उत्तीर्ण किंवा ITI कोर्सनियमित
१०ड्रायव्हर (Driver - LMV)०११० वी / ITI आणि LMV ड्रायव्हिंग लायसन्सनियमित 

संस्थेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, आर्किटेक्ट पदासाठी संबंधित विषयातील पदवी व ३ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. सहाय्यक व कनिष्ठ अभियंता पदांसाठी सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील पदवी/डिप्लोमाधारक पात्र ठरतील. तसेच ड्राफ्ट्समन आणि तंत्रज्ञ पदासाठी आयटीआय किंवा डिप्लोमा आवश्यक आहे. लिपिक (LDC) पदासाठी १२ वी किंवा डिप्लोमा उत्तीर्ण असण्यासोबत संगणकावर मिनिटाला ३० शब्द टायपिंग स्पीड असणे अनिवार्य आहे. एमटीएस व ड्रायव्हर पदासाठी १० वी उत्तीर्ण किंवा आयटीआय उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. सर्व पदांसाठी कोकणी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असून मराठी भाषेचे ज्ञान असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. उमेदवारांचे वय १२ ऑक्टोबर २०२६ रोजी ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.   

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांच्या (जन्मदाखला, शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव दाखला, १५ वर्षांचा गोवा रहिवासाचा दाखला, एम्प्लॉयमेंट कार्ड इत्यादी) स्व-साक्षांकित प्रतींसह जमा करणे आवश्यक आहे. अर्जाचा नमुना पणजी येथील पाटो प्लाझा स्थित बीएसएनएल प्रशासकीय इमारतीतील ६ व्या मजल्यावर असलेल्या गोवा पुनर्वसन मंडळाच्या कार्यालयात उपलब्ध आहे. पूर्ण भरलेले अर्ज १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत प्रत्यक्ष किंवा टपालद्वारे कार्यालयात पोहोचणे अनिवार्य आहे. उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि संगणक चाचणीच्या (Computer Test) गुणवत्तेवर आधारित केली जाईल, अशी माहिती मंडळाचे सचिव रोहन कसकर यांनी दिली आहे.