मुंबई : भारत सरकारच्या सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) 'यंग प्रोफेश्नल्स' (Young Professional) या पदांसाठी कंत्राटी तत्त्वावर भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. आयोगाने पात्र व इच्छूक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले आहेत.
या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण १० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (Masters Degree / Post Graduation) पूर्ण केलेले उमेदवार या पदासाठी पात्र ठरतील. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती मुंबई, अहमदाबाद आणि गोवा यांपैकी एका ठिकाणी केली जाणार आहे.
ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० ऑक्टोबर २०२६ ही निश्चित करण्यात आली आहे. भरतीसंबंधीचे नियम, अटी व सविस्तर माहिती KVIC च्या अधिकृत संकेतस्थळावर (www.kvic.gov.in) 'Vacancy' विभागात उपलब्ध करून देण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज सादर करावेत, असे आवाहन खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या पश्चिम विभागीय उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले आहे.


