फोंडा : गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या डॉ. दादा वैद्य विद्या संकुल, फोंडा येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी कंत्राटी तत्त्वावर विविध पदांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती अंतर्गत प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, संगणक शिक्षक, विशेष शिक्षक (स्पेशल एज्युकेटर) आणि मदतनीस या पदांसाठी थेट मुलाखतींचे (Walk-in-Interview) आयोजन करण्यात आले आहे. ही प्रक्रिया बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडणार आहे.
| अ. क्र. | पद | एकूण जागा | शैक्षणिक पात्रता (Qualification) | नोंदणीची वेळ | मुलाखतीची तारीख |
| १ | प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (गणित / विज्ञान ) | २ (Leave Vacancy) | बी.एससी., बी.एड., टीईटी | सकाळी ९.०० ते १०.०० | ०७/१०/२०२६ |
| २ | संगणक शिक्षक (आयटी / कम्प्युटर) | १ (Leave Vacancy) | बी.ए. (आयटी / कम्प्युटर) किंवा मान्य विद्यापीठाची बीसीए पदवी | सकाळी १०.३० ते ११.३० | ०७/१०/२०२६ |
| ३ | विशेष शिक्षक (विशेष शिक्षण) | १ | बी. ए / बी. एससी. सोबत बी.एड (Special Education), टीईटी आणि आर.सी. आय.नोंदणी प्रमाणपत्र | सकाळी ११.३० ते १२.३० | ०७/१०/२०२६ |
| ४ | आया / मदतनीस | १ | १० वी पास | दुपारी १२.३० ते १.०० | ०७/१०/२०२६ |
या थेट मुलाखती ७ ऑक्टोबर २०२६ रोजी गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या फोंडा येथील कार्यालयात होणार आहेत. इच्छुकांनी बायोडाटा, सर्व मूळ व छायांकित प्रमाणपत्रे, जन्मदाखला, रहिवासी दाखला, एम्प्लॉयमेंट कार्ड आणि टीईटी उत्तीर्ण प्रमाणपत्र यांसह दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन व्यवस्थापकीय समितीच्या अध्यक्षांनी केले आहे.


