पणजी: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या सुशिक्षित तरुणांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी आहे. ‘इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन’ (IBPS) मार्फत ‘कस्टमर सर्व्हिस असोसिएट’ (कनिष्ठ लिपिक / Clerk) या पदासाठी तब्बल ११,४०३ जागांची मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेअंतर्गत गोव्यासाठी ६१ जागा तर महाराष्ट्रासाठी १,०५१ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांसारख्या नामांकित सार्वजनिक बँकांमध्ये ही पदे भरली जाणार आहेत.

पात्रता आणि वयोमर्यादा:
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी (Graduation) धारण केलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील. तसेच उमेदवाराला संगणकाचे मूलभूत ज्ञान आणि संबंधित राज्याच्या स्थानिक भाषेचे प्राविण्य असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा: ३१ जुलै २०२६ रोजी उमेदवाराचे वय २० ते २८ वर्षांच्या दरम्यान (जन्म २ ऑगस्ट १९९८ ते १ ऑगस्ट २००६ दरम्यान) असावे.
वयोमर्यादेत सवलत: मागासवर्गीय, अनुसूचित जाती/जमाती (SC/ST/OBC) आणि दिव्यांग उमेदवारांना शासकीय नियमानुसार वयोमर्यादेत सवलत लागू असेल.
निवड प्रक्रिया आणि वेतन:
निवड प्रक्रिया एकूण तीन टप्प्यांत पार पडणार आहे:
१. पूर्व परीक्षा (Prelims): ऑक्टोबर २०२६
२. मुख्य परीक्षा (Mains): डिसेंबर २०२६
३. स्थानिक भाषा चाचणी (Local Language Test)
अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना २४,०५० ते ६४,४८० रुपये मूळ वेतनासह महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA) व इतर वैद्यकीय सुविधा मिळतील. निवड प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना मार्च २०२७ मध्ये अंतिम नियुक्ती दिली जाईल.
अर्ज कसा करावा?
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २१ ऑगस्ट २०२६ पूर्वी IBPS च्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत.
महत्त्वाच्या लिंक्स:
ऑनलाईन अर्जासाठी लिंक: IBPS Online Application (https://ibpsreg.ibps.in/csaxvijul26/)
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी: Official Notification PDF (https://shorturl.at/VQDiy)


