कोमुनिदाद प्रशासनासाठी एकूण ९४ रिक्त पदांसाठी अधिकृत भरती प्रक्रिया सुरू झाली असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती मोहिमेत अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) आणि मल्टिलास्क स्टाफ (MTS) या पदांचा समावेश आहे. उत्तर गोव्यात एकूण ४८ तर दक्षिण गोव्यात ४६ जागांवर भरती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता
युडीसी पदवीसह एक वर्षाचा प्रशासकीय अनुभब आणि ६ महिन्यांचे कॉम्प्युटर कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. एलडीसी पदासाठी एचएसएससी (HSSC) उत्तीर्ण, ३० डब्ल्यूपीएम इंग्रजी टायपिंग आणि किमान १ वर्षाचा कामाचा अनुभव मागितला आहे. तसेच एमटीएस पदासाठी एसएससी किंवा संबंधित आयटीआय (ITI) प्रमाणपत्रासह एक वर्षाचा अनुभव गरजेचा आहे. या सर्व पदांसाठी कोकणी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले असून, अर्ज करण्यासाठी १५ वर्षांचे गोव्याचे निवास प्रमाणपत्र आणि गोवा रोजगार नोंदणी कार्ड असणे बंधनकारक आहे.
वयोमर्यादा आणि आरक्षण
उमेदवारांचे कमाल वय ४५ वर्षांपर्यंत असावे. नियमांनुसार एससी/एसटी प्रवर्गासाठी ५ वर्षे, ओबीसीसाठी ३ वर्षे आणि दिव्यांग उमेदवारांसाठी १० वर्षांपर्यंत सवलत देण्यात आली आहे. निवडीसाठी लेखी वस्तुनिष्ठ परीक्षा (Objective Exam) घेतली जाणार असून, यामध्ये सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित आणि मूलभूत संगणक ज्ञान यावर ६० टक्के, कोकणी भाषेवर १५ टक्के तर पद-संबंधित ज्ञानावर २५ टक्के गुण असतील.
अर्ज शुल्क
अर्ज शुल्क म्हणून जनरल प्रवर्गासाठी ६०० रुपये, ओबीसी आणि ईडब्ल्यूएससाठी ३०० रुपये, तर एससी/एसटी प्रवर्गासाठी २०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. दिव्यांगांसाठी अर्ज शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे.
अर्ज कसा करावा
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ नोव्हेंबर २०२६ आहे. इच्छुक उमेदवारांनी https://ltgoa.formsubmit.in या संकेतस्थळावर जाऊन लवकरात लवकर अर्ज करावा.


