Govt Jobs : गोवा शिपयार्डमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु

गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये ९१ नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्रता, वेतन आणि ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ नोव्हेंबर २०२६ आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
30th October, 03:45 pm
Govt Jobs : गोवा शिपयार्डमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु

पणजी : गोवा शिपयार्ड लिमिटेडने २०२६ साठी विविध ९१ नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांच्या भरतीची अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार २७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.   

गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) ही भारत सरकारच्या रक्षण मंत्रालयांतर्गत येणारी नामांकित कंपनी असून, विविध नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांच्या ९१ जागांसाठी भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेत टेक्निकल असिस्टंट, ज्युनियर सुपरवायझर, वेल्डर, नर्स, शिपराइट फिटर यांसारख्या २० वेगवेगळ्या श्रेणीतील पदांचा समावेश आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदांनुसार १० वी, आयटीआय (ITI), डिप्लोमा, पदवी किंवा संबंधित क्षेत्रातील अनुभव अशी ठरवण्यात आली आहे. ही नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी असून, यात निवड झालेल्या उमेदवारांना पहिल्या वर्षी आकर्षक वेतन मिळणार आहे.   

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया २८ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ नोव्हेंबर २०२६ आहे. उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि स्किल किंवा ट्रेड टेस्टच्या आधारे केली जाणार. 

अर्ज करण्यासाठी आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ www.goashipyard.in यावर भेट द्यावी.