केरी-खांडेपार येथे रस्त्याच्या बाजूच्या कंटेनरला दुचाकीची धडक; विद्यार्थी गंभीर

या रस्त्यावर यापूर्वी अशाच प्रकारच्या अपघातात एकाचा मृत्यू; केरी-खांडेपार (Keri-Khandepar in Ponda Taluka) येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला एका आयटीआय विद्यार्थ्याच्या (ITI Student) दुचाकीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात विद्यार्थी गंभीर जखमी झाला.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
केरी-खांडेपार येथे रस्त्याच्या बाजूच्या कंटेनरला दुचाकीची धडक; विद्यार्थी गंभीर

फोंडा : केरी-खांडेपार (Keri-Khandepar in Ponda Taluka) येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला एका आयटीआय विद्यार्थ्याच्या (ITI Student) दुचाकीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात विद्यार्थी गंभीर जखमी झाला. या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थी आपल्या दुचाकीतून केरी-खांडेपार परिसरातून जात असताना रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या कंटेनरला त्याच्या वाहनाची जोरदार धडक बसली. धडक इतकी जोरदार होती की, विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमी विद्यार्थ्याला तातडीने उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (जीएमसी), बांबोळी येथील इस्पितळात हलविण्यात आले.

विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर जीएमसीमध्ये उपचार सुरू आहेत. अपघात नेमका कशामुळे घडला, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

यापूर्वी अपघातात एकाचा मृत्यू

केरी-खांडेपार येथे अशाच प्रकारचा हा दुसरा अपघात आहे. यापू्र्वी रस्त्याच्या बाजूला उभ्या करून ठेवलेल्या कंटेनरला एका दुचाकीने धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला हॉस्प‌िटलात नेण्यात आले असता; मृत घोषित करण्यात आले होते.  

(बातमी अपडेट होत आहे.)

हेही वाचा
सर्व पहा