म्हापसा : म्हापसा, बार्देश येथील सेंट झेविअर्स उच्च माध्यमिक विद्यालयात विविध पदांसाठी नियमित (Regular Basis) तत्त्वावर भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या प्रक्रियेअंतर्गत विविध विषयांचे ग्रेड-१ शिक्षक, शारीरिक शिक्षण शिक्षक आणि मल्टिटास्किंग स्टाफ या पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत.
| अ. क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | एकूण पदे |
| १ | शिक्षक ग्रेड-१ (हिंदी) | एम.ए. (हिंदी) आणि बी.एड. | ०४ |
| २ | शिक्षक ग्रेड-१ (कोकणी) | एम.ए. (कोकणी) आणि बी.एड. | ०१ |
| ३ | शिक्षक ग्रेड-१ (इंग्रजी) | एम.ए. (इंग्रजी) आणि बी.एड. | ०२ |
| ४ | शिक्षक ग्रेड-१ (जीवशास्त्र / बायॉलॉजी) | एम.एससी. (वनस्पतीशास्त्र किंवा प्राणीशास्त्र) आणि बी.एड. किंवा एम.एससी. (लाइफ सायन्स / बायोसायन्स / जेनेटिक्स / मायक्रोबायॉलॉजी / बायोटेक्नॉलॉजी / बायोकेमिस्ट्री / मॉलिक्युलर बायॉलॉजी / प्लँट फिजियोलॉजी) आणि बी.एड. (पदवी स्तरावर दुसऱ्या वर्षापर्यंत वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र विषय असणे आवश्यक) | ०२ |
| ५ | शिक्षक ग्रेड-१ (भौतिकशास्त्र / फिजिक्स) | एम.एससी. (फिजिक्स) आणि बी.एड. | ०२ |
| ६ | शारीरिक शिक्षण शिक्षक | पदव्युत्तर पदवी आणि बी.पी.एड. किंवा पदवी आणि एम.पी.एड. | ०१ |
| ७ | मल्टिटास्किंग स्टाफ (एम.टी.एस.) | १० वी (एस.एस.सी.) उत्तीर्ण | ०१ |
या पदांसाठी शासकीय भरती नियमांनुसार शैक्षणिक पात्रता अनिवार्य करण्यात आली आहे. शिक्षक पदांसाठी संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी आणि बी.एड. (B.Ed.) असणे आवश्यक आहे. शारीरिक शिक्षण शिक्षकासाठी बी.पी.एड. किंवा एम.पी.एड. पदवी तर एमटीएस पदासाठी दहावी (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय ४५ वर्षांपेक्षा कमी असावे तसेच त्यांच्याकडे वैध एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज नोंदणी आणि गोव्याचा रहिवासी दाखला असणे अनिवार्य आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांच्या आत आपले अर्ज आवश्यक प्रमाणपत्रांसह व्यवस्थापक, सेंट झेविअर्स उच्च माध्यमिक विद्यालय, म्हापसा-गोवा यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. अर्जासोबत दिलेल्या बायोडाटावर स्वतःचा ई-मेल आयडी आणि संपर्क क्रमांक स्पष्टपणे नमूद करण्याचे आवाहन शाळा व्यवस्थापनाने केले.


