पणजी : गोवा शासनाच्या विविध सरकारी विभागांमध्ये 'गट क' प्रवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी गोवा कर्मचारी निवड आयोगाने (GSSC) संक्षिप्त जाहिरात (क्र. ४/२०२६) प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत अन्न सुरक्षा अधिकारी (Food Safety Officer) आणि पशुवैद्यकीय सहाय्यक (Veterinary Assistant) या महत्त्वाच्या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.
| अ. क्र. | पदाचे नाव (Post Name) | एकूण जागा | अनारक्षित (UR) | एसटी | एससी | ओबीसी | ईडब्लूएस | विशेष आरक्षण |
| १ | अन्न सुरक्षा अधिकारी (Food Safety Officer) | ०५ | ०२ | ०१ | -- | ०२ | -- | -- |
| २ | पशुवैद्यकीय सहाय्यक (Veterinary Assistant) | २७ | १३ | ०४ | ०१ | ०७ | ०२ | ०१ जागा दिव्यांग घटकासाठी राखीव |
| एकूण | ३२ | १५ | ०५ | ०१ | ०९ | ०२ |
या पदभरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ९ ऑक्टोबर २०२६ पासून आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर (gssc.goa.gov.in) सुरू होणार असून, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० ऑक्टोबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सविस्तर जाहिरातीतील अटी व सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे, असे आवाहन आयोगाने केले आहे. परीक्षांची तारीख आयोगाच्या संकेतस्थळावर तसेच स्थानिक वृत्तपत्रांद्वारे नंतर घोषित केली जाईल.


