अनमोड घाटात भररस्त्यात मालवाहू ट्रक उलटला; चालक किरकोळ जखमी

अनमोड घाटात मोलेमच्या दिशेने जात असलेला मालवाहू ट्रक रस्त्याच्या मधोमध उलटल्याने अपघात झाला. या स्वयंअपघातात ट्रकचालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
अनमोड घाटात भररस्त्यात मालवाहू ट्रक उलटला; चालक किरकोळ जखमी

वाळपई : अनमोड घाटात मोलेमच्या दिशेने जात असलेला मालवाहू ट्रक रस्त्याच्या मधोमध उलटल्याने अपघात झाला. या स्वयंअपघातात ट्रकचालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालवाहू ट्रक अनमोड घाटातून मोलेच्या दिशेने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या मधोमध उलटला. या अपघातात ट्रकचे नुकसान झाले असून चालक किरकोळ जखमी झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत.