पाण्याचे संकट शक्य; ‘टास्क फोर्स’ स्थापन

महिन्यगणिक पाण्याची उपलब्धता, गरज यांचा आढावा घेणार; पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने ‘टास्क फोर्स’ (Task Force) स्थापन केला आहे. यंदा सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण ३० टक्के कमी राहिल्याने उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता आहे. पाण्याची कमतरता भासू नये व मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होण्यासाठी सरकारने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. महिन्यागणिक पाण्याची उपलब्धता तसेच गरज यांचा आढावा घेण्यासाठी सरकारने कृती दलाची स्थापना केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) हे कृती दलाचे प्रमुख असतील.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
37 mins ago
पाण्याचे संकट शक्य; ‘टास्क फोर्स’ स्थापन

पणजी : पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने ‘टास्क फोर्स’ (Task Force) स्थापन केला आहे. यंदा सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण ३० टक्के कमी राहिल्याने उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता आहे. पाण्याची कमतरता भासू नये व मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होण्यासाठी सरकारने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. महिन्यागणिक पाण्याची उपलब्धता तसेच गरज यांचा आढावा घेण्यासाठी सरकारने कृती दलाची स्थापना केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant)  हे कृती दलाचे प्रमुख असतील.

जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली. राज्यातील सर्व धरणात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. यामुळे पाण्याबाबत कोणतीही भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. पुढील ऑगस्ट महिन्यापर्यंत पाणी उपलब्ध होईल, अशा प्रकारे पाण्याचे नियोजन केले जाईल, असे शिरोडकर यांनी सांगितले.

गुरूवारी झालेल्या बैठकीत पाण्याचा आढावा घेण्यासाठी कृती दल स्थापन करण्याचा निर्णय झाला. जलस्रोत, पेयजल, कृषी, हवामान अशा दहा खात्यांच्या प्रमुखांचा समावेश कृती दलात करण्यात आला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे कृती दलाचे प्रमुख असून जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांचा कृती दलात समावेश आहे.

पाण्याची उपलब्धता, पिण्यासाठी पाण्याची गरज, शेतीसाठी गरज व इतर व्यावसायिक वापराची गरज यांची माहिती घेतली जाईल. पाण्याची उपलब्धता आणि गरज यांची सांगड घालून उपाय योजना केल्या जातील. यासाठी कृती दलाच्या नियमितपणे बैठका होणार आहेत. सध्या सर्व धरणांमध्ये पाणी उपलब्ध आहे.

यामुळे निर्बंध घालण्याचा कोणताही विचार नाही. मात्र परिस्थितीत बदल होणे शक्य आहे. परिस्थितीचा विचार करून निर्बंध घातले जातील. यामुळे भविष्यात जलतरण तलावांवर निर्बंध घातले जाणे शक्य आहे. सध्या मात्र असा कोणताही निर्णय झालेला नाही, असे ते म्हणाले.

येत्या आठवड्यात पावसाची शक्यता

राज्यातील तापमान वाढत आहे. तापमानामुळे पाण्याची गरजही वाढली आहे. सध्या तमीळनाडूत पाऊस पडत आहे. येत्या आठवड्यात गोव्यातही पावसाची शक्यता हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेतीमुळे सध्या बंधाऱ्यांचे काम सुरू करणे खात्याला शक्य झालेले नाही. याबाबत कृषी खात्याकडे चर्चा केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.        

हेही वाचा
सर्व पहा