भारतीय ट्रक चालकाचे नशीब फळफळले; दुबईत जिंकले १.३ कोटींचे लॉटरी बक्षीस

केरळमधील अभियंत्याला मुलाची जन्म तारीख, जन्म वर्ष ठरले लकी; दुबईत जिंकले २६ लाख रुपये : दुबईत (Dubai) ट्रकचालक म्हणून काम करणाऱ्या पंजाबच्या (Punjab) ५३ वर्षीय कुलवंत सिंह यांचे नशीब उजळले आहे. अबू धाबी बिग तिकीटच्या ‘सिरीज २९१’ लकी ड्रॉमध्ये त्यांनी ५ लाख दिरहॅम म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे १.३ कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले आहे. (Truck Driver From Punjab Wins Rs 1.3 Crore Lottery in Dubai). या अनपेक्षित यशामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळणार आहे. बक्षिसाची रक्कम घरासाठी आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरण्याचा त्यांचा मानस आहे. या ड्रॉमध्ये केरळमधील (Kerala) ३० वर्षीय अभियंता मोहम्मद इजास सी यांनाही १ लाख दिरहॅम म्हणजेच सुमारे २६ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. त्यांनी आपल्या मुलाची जन्मतारीख आणि जन्मवर्ष यांच्याशी संबंधित अंक निवडले होते.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
46 mins ago
भारतीय ट्रक चालकाचे नशीब फळफळले; दुबईत जिंकले १.३ कोटींचे लॉटरी बक्षीस

चंदीगड: दुबईत (Dubai)  ट्रकचालक म्हणून काम करणाऱ्या पंजाबच्या (Punjab) ५३ वर्षीय कुलवंत सिंह यांचे नशीब उजळले आहे. अबू धाबी बिग तिकीटच्या ‘सिरीज २९१’ लकी ड्रॉमध्ये त्यांनी ५ लाख दिरहॅम म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे १.३ कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले आहे. (Truck Driver From Punjab Wins Rs 1.3 Crore Lottery in Dubai). या अनपेक्षित यशामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळणार आहे. बक्षिसाची रक्कम घरासाठी आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरण्याचा त्यांचा मानस आहे. या ड्रॉमध्ये केरळमधील (Kerala) ३० वर्षीय अभियंता मोहम्मद इजास सी यांनाही १ लाख दिरहॅम म्हणजेच सुमारे २६ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. त्यांनी आपल्या मुलाची जन्मतारीख आणि जन्मवर्ष यांच्याशी संबंधित अंक निवडले होते.

कुलवंत सिंह हे मूळचे पंजाबचे असून, गेल्या १८ वर्षांपासून दुबईतील जेबेल अली परिसरात राहून काम करत आहेत. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, त्यांनी आपल्या भारतीय मित्रांसोबत मिळून सुमारे दोन वर्षांपासून या लकी ड्रॉमध्ये सहभाग घेतला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले.

सिंह यांनी सांगितले की, ऑनलाईन व्हिडिओंच्या माध्यमातून त्यांना या लकी ड्रॉची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी सहजगत्या एक तिकीट निवडले होते. मात्र, हेच तिकीट त्यांच्यासाठी भाग्यवान ठरेल, याची त्यांना कल्पनाही नव्हती.

“आम्ही दर महिन्याला एकत्र तिकिटे खरेदी करतो. अखेर बक्षीस जिंकल्याची बातमी समजली, तेव्हा खूप आनंद झाला,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मिळालेल्या पैशांचा उपयोग कुटुंबासाठी आणि घरासाठी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भविष्यातही मित्रांसोबत लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्याचा त्यांचा विचार आहे.

केरळमधील अभियंत्याने ‌जिंकले १ लाख दिरहॅम

दरम्यान, या ड्रॉमध्ये केरळमधील ३० वर्षीय अभियंता मोहम्मद इजास सी यांनाही १ लाख दिरहॅम म्हणजेच सुमारे २६ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. त्यांनी आपल्या मुलाची जन्मतारीख आणि जन्मवर्ष यांच्याशी संबंधित अंक निवडले होते. त्याच क्रमांकाला बक्षीस मिळाल्याने हा क्षण आपल्यासाठी अत्यंत खास असल्याचे त्यांनी सांगितले. परदेशात कष्ट करणाऱ्या भारतीयांच्या नशिबाला मिळालेल्या या अनपेक्षित कलाटणीची सध्या चर्चा होत आहे.

हेही वाचा
सर्व पहा