भगवंत मान यांच्या कॅम्प कार्यालयावर सीबीआयचे छापे; मुख्यमंत्र्यांचा ‘सूडबुद्धी’चा आरोप

ओएसडीसहीत सहा जणांविरुद्ध कथित भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा नोंद; पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कॅम्प कार्यालयासह पंजाब आणि चंदीगडमधील एकूण आठ ठिकाणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) छापेमारी केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणी कथित भ्रष्टाचार प्रकरणात ओएसडी राजबीर घुमनसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईवर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारवर ‘सूडबुद्धीचे राजकारण’ केल्याचा आरोप केला आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
07th October, 11:58 am
भगवंत मान यांच्या कॅम्प कार्यालयावर सीबीआयचे छापे; मुख्यमंत्र्यांचा ‘सूडबुद्धी’चा आरोप

चंदीगड : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कॅम्प कार्यालयासह पंजाब आणि चंदीगडमधील एकूण आठ ठिकाणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) छापेमारी केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणी कथित भ्रष्टाचार प्रकरणात ओएसडी राजबीर घुमनसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईवर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारवर ‘सूडबुद्धीचे राजकारण’ केल्याचा आरोप केला आहे.

सीबीआयने चंदीगड, मोहाली, गुरदासपूर, लुधियाना, पतियाळा, संगरूर आणि जालंधर येथे छापे टाकून संबंधित असलेल्या परिसरांची झडती घेतली. त्यांनी लॅपटॉप, मोबाईल फोन आणि आर्थ‌िक कागदपत्रे जप्त केली.‍

मुख्यमंत्री कार्यालयातील महत्त्वाच्या पदावर असणारे ओएसडी राजबीर घुमन आणि त्यांच्या साथीदारांवर अधिकाऱ्यांची बदली. प्रशासकीय मंजुरी, शासकीय टेंडर आणि सरकारी धोरणांमध्ये बदल करण्यासाठी लाच घेतल्याचा गंभीर आरोप आहे.

ईडीची तक्रार

ईडीने या घोटाळ्यासंदर्भात पंजाब पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, पंजाब पोलिसांनी यावर योग्य कारवाई न केल्यामुळे हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढत याप्रकरणाचा तपास थेट सीबीआयकडे सोपवला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने तातडीने गुन्हा दाखल करून पंजाब आणि चंदीगडमधील एकूण आठ ठिकाणी छापे टाकले.  

प्रतिमा मलिन करण्यासाठी ईडी, सीबीआयचा वापर : मुख्यमंत्री

या छाप्यांनंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप आगामी पंजाब विधानसभा निवडणुकांची तयारी करत असून, ‘आप’ सरकारची आणि माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी ईडी आणि सीबीआयचा वापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


हेही वाचा
सर्व पहा