कणकवली : प्रख्यात कवयित्री डाॅ.शरयू आसोलकर यांचा अपघाती मृत्यू

गाय रस्त्यावर आल्याने कारला भीषण अपघात; भाऊ गंभीर : मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली जवळ नांदगाव ओटव फाटा येथे कार दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात सिंधुदुर्ग येथील प्रख्यात कवयित्री आणि प्राध्यापिका डाॅ. शरयू कृष्णा आसोलकर (वय ५९ रा. माठेवाडा सावंतवाडी) यांचा मृत्यू झाला. त्यांचे भाऊ वैभव कृष्णा आसोलकर (वय ४६) गंभीर जखमी झाले.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
32 mins ago
कणकवली : प्रख्यात कवयित्री डाॅ.शरयू आसोलकर यांचा अपघाती मृत्यू

सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) कणकवली जवळ नांदगाव ओटव फाटा येथे कार दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात सिंधुदुर्ग येथील प्रख्यात कवयित्री आणि प्राध्यापिका डाॅ. शरयू कृष्णा आसोलकर (वय ५९ रा. माठेवाडा सावंतवाडी) यांचा मृत्यू झाला. त्यांचे भाऊ वैभव कृष्णा आसोलकर (वय ४६) गंभीर जखमी झाले. त्यांना कणकवली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोघेही रत्नागिरीतून  सावंतवाडी येथे येत असताना अपघात घडला.

सोमवारी सकाळी ७.३० वाजता अपघात घडला. रत्नागिरीहून सावंतवाडी येथे येताना कणकवली नांदगाव ओटव फाटा येथे कार समोर अचानक गाय आली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार महामार्गाच्या दुभाजकावर आदळली. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. नांदगावच्या पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात माहिती दिली. जखमींना नांदगाव केंद्र तसेच नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून कणकवली येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डाॅ. शरयू आसोलकर यांचा मृत्यू झाला.

शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रावर शोककळा

डाॅ. शरयू आसोलकर या कुडाळ येथील महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. अध्यापन क्षेत्रात त्यांचे योगदान होते. तसेच कवयित्री म्हणूनही साहित्यविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचे अचानक निधन झाल्याने शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून दु:ख व्यक्त केले जात आहे. एक प्रतिभावान कवयित्री भीषण अपघाताने हिरावून नेल्याच्या भावना साहित्यप्रेमींनी व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा
सर्व पहा