मुंबई-गोवा महामार्गावर ट्रकची बसला धडक : ३८ जण जखमी; आठ गंभीर

जोरदार धडकेने बस उलटल्याने भीषण परिस्थिती; मुंबई-गोवा महामार्गावरील अंजनारी पुलावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव ट्रकने गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला मागून जोरदार धडक दिल्याने बस पुलावरच उलटली. (Mumbai-Goa luxury bus overturns after collision with truck; passengers trapped, 32 hurt ).

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
1 hours ago
मुंबई-गोवा महामार्गावर ट्रकची बसला धडक :  ३८ जण जखमी; आठ गंभीर

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील अंजनारी पुलावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव ट्रकने गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला मागून जोरदार धडक दिल्याने बस पुलावरच उलटली. (Mumbai-Goa luxury bus overturns after collision with truck; passengers trapped, 32 hurt ). या अपघातात ३८ प्रवासी जखमी झाले. त्यापैकी ८ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रत्नागिरी पोलिसांनी दिली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खासगी लक्झरी बस मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होती. त्याच दिशेने जाणाऱ्या ट्रकने अंजनारी पुलावर बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की, बसचे नियंत्रण सुटून ती रस्त्यावर उलटली. या दुर्घटनेमुळे बसमधील अनेक प्रवासी आत अडकून पडले. काही काळ घटनास्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य हाती घेत बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुरक्षित सुटका केली. जखमींना तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक खोळंबली

 या भीषण अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला. विशेषतः गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त बस आणि ट्रक बाजूला करण्याचे काम सुरू केले. सध्या पुलावरील वाहतूक एका मार्गिकेवरून सुरू करण्यात आली असून, या मार्गावर वाहतूक कोंडी कायम आहे. या अपघाताचा तपास लांजा पोलिसांकडून सुरू आहे.

हेही वाचा
सर्व पहा