रांची : दुचाकीस्वार घसरून पडल्याचा आवाज येताच बघायला गेलेल्यांना मागून आलेल्या भरधाव १८ चाकी ट्रकने चिरडले. या भीषण अपघातात एकूण सात जणांचा मृत्यू झाला. त्यात ३ लहान मुले, ३ महिला आणि एका १ पुरुषाचा समावेश आहे. झारखंडमधील (Jharkhand ) खुंटी जिल्ह्यातील जोने-लुदरू वळणाजवळील पुलाजवळ घडली. त्यामुळे एकच खळबळ माजली. ऐन दिवाळीच्या दिवसांत मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Two wheeler riders go to watch accident; seven killed in truck collision.)
गुरुवारी रात्री उशीरा पुलाजवळ दुचाकीस्वार नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला झुडपांमध्ये जाऊन पडला. ही घटना समजताच परिसरातील काही महिला व लहान मुले त्याच्या मदतीसाठी व नेमके काय घडले हे पाहण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले.
नेमका त्याचवेळी तोरपा येथून कर्राच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या १८ चाकी ट्रकने रस्त्याच्या बाजूला असलेल्या नागरिकांना धडक दिली. ट्रकच्या चाकाखाली चिरडले गेल्याने सहाजण जागीच मृत्यू पावले तर एकटा उपचार सुरू असताना मृत्यू पावला.
पाको देवी, कसिल देवी, मनहू देवी, गोलू कुमार, अंजली कुमारी, तुती कुमारी ही सहाजण जागीच मृत्यू पावले तर खुशबू कुमारी आणि सौरभ नायक यांना रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरू असताना सौरभ मृत्यू पावला तर खुशबू वर उपचार सुरू होते.
अपघातानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना (Jharkhand Police) माहिती दिली. नंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने रहिवाशांना रुग्णालयात दाखल केले.


