तेजपालची शिक्षा स्थगित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

जन्मठेपेची शिक्षा देण्याच्या गोवा सरकारच्या याचिकेवर होणार सुनावणी; तहलकाचे तत्कालीन संपादक तरुण तेजपाल (Tarun Tejpal) याला महिला पत्रकारावरील लैंगिक अत्याचार प्रकरणात गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने १० वर्षांच्या कारावासाची तसेच १० लाख २१ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा स्थगित करण्यास सर्वोच न्यायालयाने (Supreme Court of India) नकार देत तेजपालची याचिका फेटाळून लावली.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
8 hours ago
तेजपालची शिक्षा स्थगित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

पणजी : तहलकाचे तत्कालीन संपादक तरुण तेजपाल (Tarun Tejpal) याला महिला पत्रकारावरील लैंगिक अत्याचार प्रकरणात गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने १० वर्षांच्या कारावासाची तसेच १० लाख २१ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा स्थगित करण्यास सर्वोच न्यायालयाने (Supreme Court of India)  नकार देत तेजपालची याचिका फेटाळून लावली.

दिलेली शिक्षा गुन्ह्याचे गांभीर्य विचारात घेता अत्यंत अपुरी आणि सौम्य आहे, असा दावा करत गोवा सरकारने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका (SLP) दाखल केली आहे. आरोपीला कायद्यातील तरतुदींनुसार जास्तीत जास्त म्हणजेच जन्मठेपेची कमाल शिक्षा देण्यात यावी, अशी आग्रही भूमिका राज्य सरकारने केली आहे. याच्यावर पुढे सुनावणी घेण्यात येणार आहे.

 गोव्यात ७ व ८ नोव्हेंबर २०१३ रोजी झालेल्या ‘थिंक फेस्ट’ सोहळ्यावेळी हॉटेलच्या लिफ्टमध्ये एका सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तेजपालवर ठेवण्यात आला होता. याप्रकरणी तेजपालला गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने १० वर्षांचा कारावास आणि १० लाख २१ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. यास तरुण तेजपाल याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून शिक्षेला आव्हान दिले होते.

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असता भारताचे सॉ‌लिसीटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली.त्यांना अॅडव्होकेट जनरल देव‌‌िदास पांगम, ॲड. शैलेद्र भोबे, ॲड. निखिल वझे यांनी साथ दिली.

जामीन देण्यास नकार 

दरम्यान, तरुण तेजपाल याला जामीन देण्यासाही न्यायालयाने नकार दिला. 


हेही वाचा
सर्व पहा