वास्कोतील आगपीडितांना आमदाराचा मदतीचा हात!

आगपीडितांना दिला आपला दोन वर्षांचा पगार; येथील मॉडर्न मार्केटला भीषण आग लागून नुकसान झालेल्या दुकानदारांना मदतीचे आश्वासन देणारे वास्कोचे आमदार कृष्णा तथा दाजी साळकर यांनी आपला शब्द पाळत मदत केली. त्यांनी आपल्या दोन वर्षांच्या पगाराची रक्कम नुकसानग्रस्त दुकानदारांना आर्थिक मदत म्हणून वितरित केली. येथील मॉडर्न मार्केटला (Vasco mordent market) भीषण आग लागून नुकसान झालेल्या दुकानदारांना मदतीचे आश्वासन देणारे वास्कोचे आमदार कृष्णा तथा दाजी साळकर (Krishna allias Daji Salkar) यांनी आपला शब्द पाळत मदत केली. त्यांनी आपल्या दोन वर्षांच्या पगाराची रक्कम नुकसानग्रस्त दुकानदारांना आर्थिक मदत म्हणून वितरित केली.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
10 hours ago
वास्कोतील आगपीडितांना  आमदाराचा मदतीचा हात!

वास्को : येथील मॉडर्न मार्केटला (Vasco mordent market)  भीषण आग लागून नुकसान झालेल्या दुकानदारांना मदतीचे आश्वासन देणारे वास्कोचे आमदार कृष्णा तथा दाजी  साळकर (Krishna allias Daji Salkar)  यांनी आपला शब्द पाळत मदत केली. त्यांनी आपल्या दोन वर्षांच्या पगाराची रक्कम आगपीडित  दुकानदारांना आर्थिक मदत म्हणून वितरित केली.

या आगीत अनेक दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. या व्यापाऱ्यांना पुन्हा व्यवसाय उभा करण्यासाठी आधार मिळावा, या उद्देशाने साळकर यांनी स्वतःच्या दोन वर्षांच्या पगारातून आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांनी बाधित दुकानदारांना मदतीचे वाटप केले.

‘माझ्याकडून करण्यात आलेली ही छोटीशी मदत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी आणि झालेले नुकसान सावरण्यासाठी त्यांना थोडा आधार मिळावा, एवढाच माझा प्रामाणिक प्रयत्न आहे,’ अशी भावना आमदार साळकर यांनी व्यक्त केली.

दरम्यान, संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे केल्याबद्दल बाधित दुकानदारांनी साळकर यांचे मनापासून आभार मानले. त्यांच्या या संवेदनशील भूमिकेचे आणि व्यापाऱ्यांप्रती दाखवलेल्या जिव्हाळ्याचे त्यांनी कौतुक केले. 

हेही वाचा
सर्व पहा