गोवन वार्ता ‘देवभूमी’ कॉफी टेबल बूक बाजारात

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन : गोव्यातील ४१ नयनरम्य देवस्थानांची सचित्र माहिती

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
05th November, 11:36 pm
गोवन वार्ता ‘देवभूमी’ कॉफी टेबल बूक बाजारात

गोवन वार्ता ‘देवभूमी’ कॉफी टेबल बूकचे प्रकाशन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत संपादक पांडुरंग गावकर, रवींद्र पाटील, अमित पोकळे आणि प्रदीप जोशी. (कैलास नाईक)

पणजी : गोव्याची समृद्ध धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जगासमोर आणणाऱ्या ‘गोवन वार्ता’च्या ‘देवभूमी’ या अत्यंत देखण्या कॉफी टेबल बूकचे प्रकाशन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते थाटात करण्यात आले. आल्तिनो-पणजी येथील मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘महालक्ष्मी’ येथे हा दिमाखदार सोहळा पार पडला.
या सोहळ्याप्रसंगी ‘गोवन वार्ता’चे संपादक पांडुरंग गावकर, जाहिरात विभागाचे डीजीएम रवींद्र पाटील, जाहिरात व्यवस्थापक अमित पोकळे आणि उपवृत्त संपादक प्रदीप जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यापूर्वी ‘गोवन वार्ता’ने प्रकाशित केलेल्या ‘देवभूमी गोवा’ या पहिल्या आवृत्तीला गोमंतकीय आणि भाविक वाचकांचा भरघोस प्रतिसाद लाभला होता. पहिल्या भागाच्या उत्स्फूर्त स्वागतानंतर आणि वाचकांच्या आग्रहास्तव हा ‘देवभूमी’चा (भाग २) विशेष अंक प्रकाशित करण्यात आला आहे.
दर्जेदार आणि देखणा मजकूर असलेल्या या कॉफी टेबल बूकची किंमत फक्त ३०० रुपये आहे. हे पुस्तक गोव्यातील सर्व प्रमुख बुक स्टॉल्सवर विक्रीसाठी उपलब्ध झाले असून, वाचकांनी आपली प्रत आजच सुरक्षित करावी, असे आवाहन दै. 'गोवन वार्ता' परिवारातर्फे करण्यात आले आहे.
‘देवभूमी’ कॉफी टेबल बूकची वैशिष्ट्ये...
• ४१ देवस्थानांचा इतिहास : गोव्यातील प्रमुख ४१ देवस्थानांची अभ्यासपूर्ण आणि प्रासादिक माहिती यात देण्यात आली आहे.
• चित्तवेधक छायाचित्रे : केवळ माहितीच नव्हे, तर संबंधित देवस्थान, ‘श्रीं’ची विलोभनीय मूर्ती आणि मंदिराच्या नयनरम्य परिसराची अत्यंत आकर्षक व उच्च दर्जाची रंगीत छायाचित्रे हे या पुस्तकाचे मुख्य आकर्षण आहे.
• संग्रहणीय ठेवा : एकूण १८० पानांचे हे देखणे पुस्तक प्रत्येक गोमंतकीयाच्या घरात असावे असा एक अमूल्य धार्मिक ठेवा आहे.    

हेही वाचा
सर्व पहा