पणजी : गोवा समग्र शिक्षण संचालनालयाने (Goa Samagra Shiksha (GSS)) २०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी कंत्राटी तत्त्वार व्यावसायिक प्रशिक्षण देणारे शिक्षक (व्होकेशनल ट्रेनर्स) आणि एका विशेष शिक्षकाच्या पदासाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. एकूण ४४ पदांसाठी १२ आणि १३ नोव्हेंबर २०२६ दिवशी मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
त्यात उद्योजकता, दूरसंचार, मीडिया आणि मनोरंजन, रिटेल, शेती, ब्युटी आणि वेलनेस, ऑटोमोटिव्ह अशा वेगवेगळ्या व्यावसायिक क्षेत्रांशी संबंधित ४३ व्होकेशनल ट्रेनर्सच्या पदांचा समावेश आहे. तसेच विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एका विशेष शिक्षकाची नेमणूक करायची आहे.
१२ नोव्हेंबरला सकाळी १०.३० ते दुपारी १.३० पर्यंत आणि दुपारी २.३० ते संध्याकाळी ५ पर्यंत मुलाखती होणार. १३ नोव्हेंबरला सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात मुलाखती घेतल्या जाणार. विशेष शिक्षकाच्या एका पदासाठी १२ नोव्हेंबरला सकाळी १०.३० वाजता मुलाखती होणार.
उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळापत्रकाप्रमाणे हजर रहावे. शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर आवश्यक कागदपत्रांसहीत उमेदवारांनी मुलाखतीसाठी यावे, असे समग्र शिक्षातर्फे कळविण्यात आले आहे. अधिक तपशील आणि वेळापत्रक खात्याच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.


