तायक्वांदो अकादमी ऑफ वास्कोची गिनीज बुकमध्ये नोंद

लंडनच्या गिनीज मुख्यालयाकडून अधिकृत विश्वविक्रमाची मोहोर; तायक्वांदो अकादमी ऑफ वास्कोच्या उल्लेखनीय कामगिरीची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे. (Taekwondo Academy of Vasco Enters History Books With Guinness World Record). विद्यार्थ्यांनी आणि प्रशिक्षकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याचा झेंडा उंचावला आहे.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
9 hours ago
तायक्वांदो अकादमी ऑफ वास्कोची गिनीज बुकमध्ये  नोंद

वास्को : तायक्वांदो अकादमी ऑफ वास्कोच्या उल्लेखनीय कामगिरीची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे. (Taekwondo Academy of Vasco Enters History Books With Guinness World Record). विद्यार्थ्यांनी आणि प्रशिक्षकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याचा झेंडा उंचावला आहे. अकादमीने सर्वाधिक मोठ्या तायक्वांदो प्रशिक्षण सत्रात सहभागी होण्याचा अधिकृत गिनीज विश्वविक्रम नोंदवला आहे. लंडन येथील गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या मुख्यालयाकडून या विक्रमाला अधिकृत प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

या ऐतिहासिक यशाचा गौरव करण्यासाठी बायणा येथील रवींद्र भवनमध्ये विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार संकल्प आमोणकर यांच्या हस्ते विश्वविक्रमात सहभागी झालेल्या विजेत्यांना गिनीज पदके आणि प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

तायक्वांदो अकादमीच्या विद्यार्थ्यांनी आणि प्रशिक्षकांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर मिळवलेले हे यश केवळ अकादमीपुरते मर्यादित नसून संपूर्ण गोव्यासाठी अभिमानाची बाब ठरले आहे. या विश्वविक्रमामुळे गोव्याच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

हेही वाचा
सर्व पहा