दिवाळीच्या रात्री अग्नीचे तांडव; देशभरात २३ जणांचा आगीत होरपळून मृत्यू

मध्यप्रदेशात १३ तर महाराष्ट्रात एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू; दिवाळीच्या रात्री फटाके आणि अन्य कारणांमुळे देशातील विविध शहरांमध्ये लागलेल्या आगीत तब्बल २३ जणांचा होरपळून मृत्यू झाला. (A fiery rampage on Diwali night; 23 people across the country perish in blazes) अनेक जण जखमी झाले.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
दिवाळीच्या रात्री अग्नीचे तांडव; देशभरात २३ जणांचा आगीत होरपळून मृत्यू

मुंबई : दिव्यांचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळीच्या आनंदावर देशभरात आगीच्या भीषण घटनांनी विरजण घातले. दिवाळीच्या रात्री फटाके आणि अन्य कारणांमुळे देशातील विविध शहरांमध्ये लागलेल्या आगीत तब्बल २३ जणांचा होरपळून मृत्यू झाला. (A fiery rampage on Diwali night; 23 people across the country perish in blazes) अनेक जण जखमी झाले.  काही जण बेपत्ता आहेत. या दुर्घटनांमध्ये मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला आहे. (13 deaths in Madhya Pradesh, and 6 deaths—all from the same family—in Maharashtra.)

मध्यप्रदेशात  १३ जणांचा मृत्यू 

मध्यप्रदेशात दोन वेगवेगळ्या घरांना लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू झाला. कटनी जिल्ह्यात एका घराला आग लागून एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी अंत झाला. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. त्यातील एका चिमुकल्याचे वय अवघे दोन महिने होते. सिवनी जिल्ह्यात सराफा व्यापाऱ्याच्या घराला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एका १६ वर्षीय किशोर वयीन मुुलाचा समावेश आहे.

धाराशिव येथे एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातही काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली. किराणा दुकानाच्या वरच्या मजल्यावर असलेल्या घराला आग लागल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. मुंबईतील लोखंडवाला परिसरात लागलेल्या आगीत आणखी एका व्यक्तीचा जीव गेला.

फटाक्यांच्या दुकानाला आग; राजस्थानमध्ये दोघांचा मृत्यू

राजस्थानच्या पाली येथे फटाक्यांच्या दुकानाला आग लागून दोघांचा मृत्यू झाला, तर तीन जण बेपत्ता आहेत. या आगीत तीन दुकाने आणि अनेक दुचाकी जळून खाक झाल्या. दिल्लीतील नरेला येथे रॉकेट फटाका पोटाला लागल्याने दहा वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला.

मुंबई, ठाणे, पुण्यातही आगीच्या घटना

मुंबईच्या डोंगरी परिसरात लागलेल्या आगीत अनेक दुकाने आणि झोपड्या जळून खाक झाल्या. दादर येथील कामगार स्टेडियमला लागलेली आग अग्निशमन दलाने अवघ्या १७ मिनिटांत आटोक्यात आणली. ठाण्यातील १७ मजली इमारतीतही आग लागली; मात्र या घटनेत कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही.

पुण्यात तब्बा ६३ आगीच्या घटना

पुण्यात दिवाळीच्या रात्री आगीच्या तब्बल ६३ घटना घडल्या. सुदैवाने या घटनांमध्ये जीवितहानी झाली नाही. नागपूरमध्ये टीव्हीएसच्या दुचाकी शोरूमला आग लागल्याने अनेक वाहने जळाली. जम्मूतील नेहरू मार्केटमध्ये लागलेल्या आगीत १२ हून अधिक दुकाने भस्मसात झाली.

उत्तर प्रदेशातील बांदा येथे भंगाराच्या दुकानाला आग लागून सुमारे २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान झाले. याशिवाय आसाममधील जोनाई, पुण्यातील वडगाव शेरी, मुंबईतील विद्याविहार, सिक्कीमची राजधानी गंगटोक आणि गाझियाबादमधील क्रॉसिंग रिपब्लिक परिसरातही आगीच्या घटना घडल्या.

या दुर्घटनांनंतर विविध ठिकाणी अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. दिवाळीच्या उत्सवाला लागलेल्या या आगींमुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा
सर्व पहा