वास्को :कोकणी भाषा, संस्कृतीआणि संगीताच्या इतिहासातसुवर्णाक्षरांनी नोंद व्हावीअसा ऐतिहासिक सोहळा मंगळुरूयेथे पार पडला. मांडसोभाणतर्फे टाऊन हॉलमध्येआयोजित करण्यात आलेल्यापहिल्या जागतिक कोकणी संगीतसंमेलनात (Global Konkani Music Conference) तब्बल १२ दिवस,१२ तास आणि १२ मिनिटेअखंड संगीताचा स्वर घुमल्याचीमाहिती आयोजकांनी दिली.
या संगीतमय प्रवासात७,२३५ कोकणी गायकांनीसहभाग घेत ४,५९६गीते सादर केली. याउपक्रमातून गिनीज वर्ल्डरेकॉर्डमध्ये नोंद करण्याचाप्रयत्न करण्यात आला.
जगभरातील कोकणीसंगीतप्रेमी आणि गायकांनाएकाच व्यासपीठावर आणणाऱ्याया संमेलनाने कोकणी भाषेचीसांस्कृतिक ताकद आणि एकतेचेदर्शन घडवले. हजारोगायकांचे स्वर, हजारोगीतांची मैफल आणि एका भाषेबद्दलचीअपार आस्था यामुळे हा सोहळाअविस्मरणीय ठरल्याची माहितीआयोजकांनी दिली.
या ऐतिहासिक उपक्रमातगोव्यातील गायकांनीही मोठ्याउत्साहाने सहभाग घेतला.गोव्याच्या विविधभागांतून आलेल्या गायकांनीकोकणी गीतांचे सादरीकरण करूनया जागतिक संगीत सोहळ्यातआपले योगदान दिल्याची माहितीआयोजकांनी दिली.


