अपघाताने हिरावला संगणक शिक्षकाचा जीव; नेत्रावळीवर शोककळा!

नेत्रावळी येथील सरकारी हायस्कूलमध्ये संगणक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रसाद गावकर (वय ४७) यांचा काल रात्री झालेल्या भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
14th November, 01:36 pm
अपघाताने हिरावला संगणक शिक्षकाचा जीव; नेत्रावळीवर शोककळा!

सांगे : नेत्रावळी येथील सरकारी हायस्कूलमध्ये संगणक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रसाद गावकर (वय ४७) यांचा काल रात्री झालेल्या भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या स्कूटरची धडक नेत्रावळी येथे शाळेच्या कुंपणाला बसून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना प्रथम केपे येथील रुग्णालयात नेण्यात आले. नंतर मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पीतळात (South Goa District Hospital) नेत असताना त्यांचे निधन झाले.

गावकर यांचे अपघाती निधन झाल्याची माहिती समजताच नेत्रावळी परिसरात शोककळा पसरली आहे. विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण देणारे शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. शाळेशी असलेले त्यांचे नाते आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदान यामुळे त्यांच्या निधनाने शाळा परिवारासह स्थानिकांना मोठा   धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर आज दुपारी नेत्रावळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, यासंदर्भात अधिक माहितीसाठी सांगेचे पोलीस निरीक्षक दितेंद्र नाईक यांना विचारले असता, त्यांनी वरील माहितीला दुजोरा दिला. नेत्रावळी येथे शाळेच्या कुंपणाला त्यांच्या स्कूटरची धडक बसली. त्यानंतर त्यांना केपे रुग्णालयात व नंतर मडगाव जिल्हा इस्पितळात नेत असताना मृत्यू पावल्याची माहिती मिळाल्याचे सांगितले. सांगे पोलीस (Sanguem Police Station) अधिक तपास करीत आहेत. 

हेही वाचा
सर्व पहा