सांताक्रुझ येथे दुचाकीची माडाला धडक; अल्पवयीनाचा उपचारादरम्यान मृत्यू

गोमेकॉतील सहा दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी; सांताक्रुझ येथे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने नारळाच्या झाडाला धडक बसून गंभीर जखमी झालेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर काल गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (गोमेकॉ) आपत्कालीन विभागातून जुने गोवे पोलिसांना (Old Goa Police Station) याबाबत माहिती देण्यात आली.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
14th November, 11:31 am
सांताक्रुझ येथे दुचाकीची माडाला धडक; अल्पवयीनाचा उपचारादरम्यान मृत्यू

पणजी : सांताक्रुझ येथे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने नारळाच्या झाडाला धडक बसून गंभीर जखमी झालेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर काल गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (गोमेकॉ) आपत्कालीन विभागातून जुने गोवे  पोलिसांना (Old Goa Police Station) याबाबत माहिती देण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास संबंधित मुलगा होंडा ॲक्टिव्हा दुचाकीवरून आपल्या घरी जात होता. सांताक्रुझ येथे त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीची नारळाच्या झाडाला जोरदार धडक बसली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर गोमेकॉमध्ये उपचार सुरू होते.

या प्रकरणी हवालदार राजेंद्र जल्मी यांनी  मोटार वाहन अपघात  नोंदवला होता. दरम्यान, १३ नोव्हेंबर रोजी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.  फॉरेन्सिक सायन्स व टॉक्सिकॉलॉजी विभागाचे व्याख्याते डॉ. अरुण कुमार यांनी केलेल्या शवचिकीत्सेत डोक्याला व मेंदूला आघातामुळे झालेली गंभीर दुखापत हे मृत्यूचे कारण असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास जुने गोवे पोलीस ठाण्याचे  उपनिरीक्षक मनोहर धुळपकर करीत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा