पर्वरी : गिरी, पर्वरी येथे उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वारा जवळ बस आणि तीन चारचाकी वाहनांचा विचित्र अपघात घडला. या अपघातात सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र, अपघातानंतर मोठी वाहतूक कोंडी झाली.
एकाच वेळी चार वाहनांचा समावेश असलेल्या या अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.या अपघातात बससह तीन चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. अपघात स्थळावरील काहीजणांनी दिलेल्या माहितीनुसार, एक कार चालक यूटर्न घेत असताना मागे असलेल्या तीन वाहनांनी कारला धडक दिली.
त्यात बसगाडीचा ही समावेश होता. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. सर्वजण सुखरूप असल्याने मोठा अनर्थ टळला. अपघात नेमका कशामुळे घडला, याबाबत अधिक तपास पोलीस (Porvorim Police) करीत आहेत.
दरम्यान, गिरी, पर्वरी येथे उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वार परिसरातील हा परिसर अपघातप्रवण असल्याचे अपघातस्थळी उपस्थित असलेल्य काहीजणांनी सांगितले. यापू्र्वीही याठिकाणी अनेक अपघात घडले आहेत. रस्त्याची रचनाच याठिकाणी धोकादायक असून, वाहने यूटर्न घेताना याठिकाणी अपघात घडत असल्याचे या रस्त्यावर नियमित वाहने चालवत असलेल्यांनी दिली.


