'३९ अ' विरोधातील आंदोलन मागे घेण्यासाठी 'शकुनी मामा','सेटिंग बाज'चा होता दबाव : आमदार बोरकर

'३९ अ' आंदोलनाचा घटनाक्रम सांगत आमदार वीरेश बोरकर यांनी मनोज परब यांच्यावर बिल्डर लॉबीशी संबंध, पक्ष फोडण्याचा प्रयत्न आणि कंत्राटावरून गंभीर आरोप करत स्पष्टीकरण दिले आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
2 hours ago
'३९ अ' विरोधातील आंदोलन मागे घेण्यासाठी 'शकुनी मामा','सेटिंग बाज'चा होता दबाव : आमदार बोरकर

पणजी : गोव्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात '३९ अ' (39A) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रंगलेल्या घडामोडींवर आरजीपीचे आमदार वीरेश बोरकर यांनी व्हिडिओद्वारे सविस्तर भूमिका मांडत पक्षातील अंतर्गत वादावर आणि मनोज परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या २६६ दिवसांपासून उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्याची वेळ आल्याचे सांगत त्यांनी कलम '३९ अ' च्या विरोधात विधानसभेत आणि मैदानात उभारलेल्या लढ्याची आठवण करून दिली. काही मंत्र्यांनी आपण एकटे पडल्याचे विधान केले होते; मात्र सातेरी आईच्या आशीर्वादाने आणि पाले गावातील ग्रामस्थांच्या एकजुटीने हा लढा पुढे सरकला. गाव वाचवण्याची शपथ घेत ग्रामस्थांनी प्रश्न सुटेपर्यंत शांत न बसण्याचा निर्धार केल्याचे बोरकर यांनी नमूद केले.




२० फेब्रुवारी २०२६ रोजी गावातील वृद्ध, महिला, तरुण आणि लहान मुले मोठ्या संख्येने टीसीपी कार्यालयात गेल्याची घटना सांगताना त्यांनी महिलांनी गाव उद्ध्वस्त होऊ देऊ नका अशी भावूक विनंती केल्याचे म्हटले. निर्णय वरिष्ठांकडे आणि मंत्र्यांकडे जातात असे सांगण्यात आल्यानंतर ग्रामस्थांनी न्याय मिळेपर्यंत तेथेच बसण्याची भूमिका घेतली. रात्री वीज आणि पंखे बंद करूनही ग्रामस्थ तेथेच राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस, उपजिल्हाधिकारी आणि मामलेदार आल्यानंतर कोणताही आदेश न दाखवता महिला, मुले आणि स्वतःलाही बाहेर ओढून काढण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या धक्काबुक्कीत स्वतः बेशुद्ध पडल्याचे आणि वृद्ध महिलांनाही त्रास सहन करावा लागल्याचे त्यांनी सांगितले.


LIVE VILLAGERS, MLA VIRESH DRAGGED OUT OF THE TCP OFFICE


या प्रकारानंतर २१ फेब्रुवारी २०२६ रोजी स्वतः आणि सहकारी तुषार यांनी अमरण उपोषण सुरू केले. सुरुवातीचे दोन दिवस पाण्याविना राहिल्याने प्रकृती खालावली; साखर आणि रक्तदाब वाढल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने सलाईन घ्यावे लागले. आंदोलन मागे घेण्यासाठी 'शकुनी मामा' (अजय) आणि 'सेटिंग बाज' (रोहन) यांच्याकडून दबाव आणला गेल्याचा आरोप करत लेखी आश्वासन आणि स्टॉप ऑर्डर मिळाल्यानंतरच उपोषण सोडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रकृती सुधारत असताना काही फॅन पेजेसची नावे बदलून विरोधात पोस्टर्स लावण्यात आल्याचा दावा त्यांनी केला असून, पैसे घेऊन वाद निर्माण करणाऱ्यांना पत्रकार परिषदेत उत्तर दिल्याचे सांगितले.


VIRESH, TUSHAR DISCHARGED FROM HOSPITAL RGP MLA Viresh Borkar and youth  Tushar Gawas were discharged from the hospital on Saturday. They were  admitted after they broke the fast at Azad Maidan.


चिंबल येथे पालखी दर्शनासाठी गेल्यानंतर काहींनी मनोज परब यांचे कान भरून आपल्याला कारणे दाखवा नोटीस बजावल्याचा आरोप बोरकर यांनी केला. ज्या ठिकाणी देवाचे दर्शन घेतले किंवा पाया पडले, तेथेही नोटिसा पाठवण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. मनोज परब सलग तीन निवडणुका आणि अलीकडची जिल्हा पंचायत निवडणूक हरले असून, स्वतःच्या बळावर निवडणूक जिंकू शकत नसल्याने दुसरा मार्ग स्वीकारल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, मनोज परब यांचे बिल्डर लॉबीशी संबंध असल्याचा, बिगर-गोमंतकीयांना कामावर ठेवल्याचा आणि पक्ष फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत त्यांनी 'कोस्टल बिल्डकेअर एलएलपी' कंपनी स्थापन करून १५० फ्लॅट्सच्या प्रकल्पाचे रंगकामाचे कंत्राट कोणाच्या आशीर्वादाने मिळाले, असा सवाल उपस्थित केला.

हेही वाचा
सर्व पहा