'चल्ला कितें, गोवा!' मोहिमेतून पणजीत आज सीजेपीचा जनसंवाद; अभिजीत-सौरव-आशुतोषची उपस्थिती

कॉक्रोच जनता पार्टीच्या 'क्या बोलती पब्लिक' मोहिमेअंतर्गत 'चल्ला कितें, गोवा!' उपक्रमाचा आज पणजीत शुभारंभ होत असून, जनसंवाद बैठकीत क्यूआर कोडद्वारे नागरिकांना आपल्या समस्या व तक्रारी नोंदवता येणार आहेत.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
5 hours ago
'चल्ला कितें, गोवा!' मोहिमेतून पणजीत आज सीजेपीचा जनसंवाद; अभिजीत-सौरव-आशुतोषची उपस्थिती

पणजी : कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) 'क्या बोलती पब्लिक' या देशव्यापी मोहिमेचा गोव्यातून प्रारंभ होत असून, आज रविवारी पणजी येथे जाहीर संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 'चल्ला कितें, गोवा!' या नावाने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि अपेक्षा थेट प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमासाठी सीजेपीचे नेते अभिजीत दिपके, सौरव दास, आशुतोष रांका यांच्यासह समितीचे सदस्य आज गोव्यात उपस्थित राहणार आहेत.


Image


सायंकाळी ४ ते ७ या वेळेत होणाऱ्या या जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांना आपल्या तक्रारी आणि विविध विषयांवरील प्रश्न थेट राष्ट्रीय प्रतिनिधींसमोर मांडण्याची संधी मिळणार आहे. आजच्या डिजिटल काळाशी सुसंगत अशी क्यूआर कोडची सुविधाही या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, ज्याद्वारे नागरिकांना आपली गाऱ्हाणी आणि प्रश्न सहजपणे नोंदवता येतील. गोव्याच्या ऐतिहासिक वारशाचा संदर्भ देत, या राष्ट्रीय मालिकेची सुरुवात गोव्यापासून करत असल्याचे सीजेपी सदस्य राणी यांनी नमूद केले आहे.


अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची सुटका; न्यायालयाने ही अट  ठेवली: सीजेपी म्हणाले, "कॉकरोच कधीच मरत नाहीत" - Marathi News | Abhijit  Deepke, Saurav ...


तरुणांना एकत्र आणून प्रशासकीय त्रुटींवर प्रश्न विचारणे आणि उत्तरदायित्वाचा आग्रह धरणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. कार्यक्रमाच्या शेवटी मागण्यांचे निवेदन सादर करून गोव्यातील समस्या सोडवण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिकाही मांडण्यात आली आहे. गोव्यातील तरुणांनी कोणत्या विषयांवर लक्ष केंद्रित करावे, हे स्थानिक नागरिकांकडूनच जाणून घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. बदलत्या सामाजिक आणि राजकीय संवादात तरुण पिढीचा सहभाग किती महत्त्वाचा ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा
सर्व पहा