नाना पाटेकर यांच्या निधनानंतर तनुश्री दत्ताच्या ‘इव्हिल डेड’ वक्तव्यावर मोठी टीका; तरी तिचा ठाम पवित्रा!

माझ्यासाठी तो अनुभव वास्तव होता’; जुन्या आरोपांचा संदर्भ देत अभिनेत्रीने मांडली भूमिका : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेल्या ‘इव्हिल डेड’ या सूचक वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठी टीका होत आहे. या टीकेनंतर तनुश्रीने नव्या व्हिडिओद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Tanushree Dutta On Her 'Evil Dead' Remark After Nana Patekar's Death) आपल्या वक्तव्यावरून माघार घेण्याची तिची तयारी नसून, आपण अनुभवलेल्या गोष्टी आपल्यासाठी वास्तव असल्याचे तिने म्हटले आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
10th October, 10:49 am
नाना पाटेकर यांच्या निधनानंतर तनुश्री दत्ताच्या ‘इव्हिल डेड’ वक्तव्यावर मोठी टीका; तरी तिचा ठाम पवित्रा!

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेल्या ‘इव्हिल डेड’ या सूचक वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठी टीका होत आहे. या टीकेनंतर तनुश्रीने नव्या व्हिडिओद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Tanushree Dutta On Her 'Evil Dead' Remark After Nana Patekar's Death) आपल्या वक्तव्यावरून माघार घेण्याची तिची तयारी नसून, आपण अनुभवलेल्या गोष्टी आपल्यासाठी वास्तव असल्याचे तिने म्हटले आहे.

नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर तनुश्रीने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला होता. त्या दिवशी कामाचा दिवस असल्याने कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे तसेच आपण लखनऊला  जात असल्याचे तिने सांगितले होते. मात्र, नानांच्या कुटुंबीयांप्रति शोकसंवेदना व्यक्त करण्यापूर्वी तिने केलेल्या ‘इव्हिल डेड’ या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला.

या वक्तव्यावरून सोशल मीडियावरील अनेक वापरकर्त्यांनी तनुश्रीवर टीका केली. ज्येष्ठ अभिनेत्याच्या निधनानंतर अशा प्रकारची भाषा वापरणे अयोग्य असल्याचे मत काहींनी व्यक्त केले.

‘माझ्यासाठी तो अनुभव वास्तव होता’ : तनुश्री

नव्या व्हिडिओमध्ये तनुश्रीने आपल्या अनुभवांबाबत भाष्य केले. इतर लोकांचा एखाद्या व्यक्तीबाबतचा अनुभव वेगळा असू शकतो; मात्र, आपण जे अनुभवले ते आपल्यासाठी वास्तव असल्याचे तिने स्पष्ट केले. जुन्या वादांना पुन्हा उजाळा देण्याचा आपला हेतू नसल्याचेही तिने सांगितले.

“एखाद्या व्यक्तीचा अनुभव इतरांपेक्षा वेगळा असू शकतो; पण माझ्यासाठी तो वास्तव आहे. एखाद्याने लोकांना त्रास दिला असेल, त्यांना पीडित केले असेल किंवा चुकीच्या गोष्टी केल्या असतील, तर त्याच्या मृत्यूनंतर त्या सर्व गोष्टी पुसल्या जातात का? माझे आयुष्य नरकासारखे झाले होते आणि त्याला तो व्यक्ती जबाबदार होता,” असे तनुश्री म्हणाली.

‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या सेटवरील आरोप

तनुश्री दत्ताने यापूर्वी नाना पाटेकर यांच्यावर ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान गैरवर्तन केल्याचे गंभीर आरोप केले होते. २०१८ मध्ये तिने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आणले होते. या आरोपांमुळे देशभरात ‘मी टू’ चळवळीच्या पार्श्वभूमीवर मोठी चर्चा झाली होती.

नाना पाटेकर यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. ‘क्रांतिवीर’, ‘अंगार’, ‘राजू बन गया जेन्टलमन’, ‘शक्ती : द पॉवर’ आणि ‘अपहरण’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या. त्यांनी ‘प्रहार : द फायनल अटॅक’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते.

हेही वाचा
सर्व पहा