गोवन वार्ता न्यूज डेस्क
नवी दिल्ली
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी देशातील ६ राज्यांचे राज्यपाल बदलले आहेत. या फेरबदलात केरळमचे राज्यपाल तथा गोव्याचे सुपुत्र राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची तामिळनाडूच्या राज्यपालपदी पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली आहे. सिक्कीमचे राज्यपाल ओम प्रकाश माथूर यांची आता केरळमच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली आहे. सिक्कीमचे राज्यपाल म्हणून दुष्यंत गौतम यांची नियुक्ती झाली आहे. ओडिशा, कर्नाटक आणि उत्तराखंडसाठीही नवीन राज्यपालांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.


