साखळी येथे आगीत एकाच वेळी चार ओला इलेक्ट्र‌िक स्कूटर जळून खाक

बॅटरीतील शॉर्टसर्क‌िटमुळे आग : डिचोली अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठी हानी टळली; साखळीतील विठ्ठलापूर येथील ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या सर्व्हिस सेंटरमध्ये लागलेल्या आगीत चार इलेक्ट्रिक स्कूटर जळून खाक झाल्या. सोमवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. डिचोली अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे आग इतर वाहनांपर्यंत पसरण्यापासून रोखण्यात यश आले. आणि मोठी हानी टळली. बॅटरीतील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती अग्न‌िशमन दलाने दिली.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
साखळी येथे आगीत एकाच वेळी चार ओला इलेक्ट्र‌िक स्कूटर जळून खाक

डिचोली : साखळीतील विठ्ठलापूर येथील ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या सर्व्हिस सेंटरमध्ये लागलेल्या आगीत चार इलेक्ट्रिक स्कूटर जळून खाक झाल्या. सोमवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. डिचोली अग्निशमन दलाने (Bicholim Fire Station) तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे आग इतर वाहनांपर्यंत पसरण्यापासून रोखण्यात यश आले. आणि मोठी हानी टळली. बॅटरीतील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती अग्न‌िशमन दलाने दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठलापूर येथील ओला स्कूटरच्या सर्व्हिस सेंटरमध्ये अचानक आग लागली. आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले आणि तेथे असलेल्या चार इलेक्ट्रिक स्कूटर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. घटनेची माहिती मिळताच डिचोली अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने अग्निशमन कार्यवाही करत आग आटोक्यात आणली. 

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी बॅटरीतील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे डिचोली अग्न‌िशमन दलाच्या अधिकाऱ्यांचे  म्हणणे आहे.  आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अग्निशमन दलाने वेळीच केलेल्या कारवाईमुळे आग इतर वाहनांपर्यंत पोहोचली नाही आणि संभाव्य मोठे नुकसान टळले. घटनेच्या कारणांचा पुढील  तपास सुरू आहे.

हेही वाचा
सर्व पहा