कोरगाव: गोव्याहून महाराष्ट्राच्या दिशेने जाणाऱ्या कर्नाटक पासिंगच्या मालवाहू वाहनाची तोरसे येथील पंचायत कार्यालयाजवळ रस्त्याच्या बाजूच्या संरक्षक भींतीला धडक बसली. राष्ट्रीय महामार्गा ६६ वर झालेल्या या अपघातात चालक सुखरूप बचावला. वाहनाच्या पुढील भागाची मोठी हानी झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास वाहन चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने वाहन बाजूला घेतले. यावेळी वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षण भिंतीवर जाऊन धडकले. या अपघातात वाहनाच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.
अपघाताच्या वेळी वाहनात चालक एकटाच होता. सुदैवाने त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. सदर वाहन गोव्याहून महाराष्ट्राच्या दिशेने माल घेऊन जात होते.


