मुंगूल, फातोर्डा येथे ट्रक-टेम्पो ट्रॅव्हलरच्या धडकेत एकाचा मृत्यू, ७ जण जखमी

मुंगूल, फातोर्डा येथे पश्चिम बगल रस्त्यावर (Mungul-Fatorda western bypass) टेम्पो ट्रॅव्हलरने पाण्याच्या टँकरला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर ७ जण जखमी झाले.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
5 hours ago
मुंगूल, फातोर्डा येथे ट्रक-टेम्पो ट्रॅव्हलरच्या धडकेत एकाचा मृत्यू, ७ जण जखमी

पणजी : मुंगूल, फातोर्डा येथे पश्चिम बगल रस्त्यावर (Mungul-Fatorda western bypass) टेम्पो ट्रॅव्हलरने पाण्याच्या टँकरला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर ७ जण जखमी झाले. धडक बसताच टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये असलेल्या एकाचे डोके टँकरला बसले. गंभीर जखमी स्थितीत त्याला हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घाे‌षित केले.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बगलरस्त्यावर मुंगुल येथे टँकरद्वारे झाडांना पाणी घालण्याचे काम सुरू होते. याचदरम्यान मागून आलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरने टँकरला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, टेम्पो ट्रॅव्हलरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याचे सांगण्यात येत आहे.

या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, ७ जण जखमी झाले आहेत. यासंदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येऊन मदतकार्या सुरू केले. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले जखमींच्या प्रकृतीबाबत तसेच अपघातातील मृत व्यक्तीची माहिती घेण्याचे काम सुरू होते. पघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Goa Police)  घटनास्थळी धाव घेतली. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.               


हेही वाचा
सर्व पहा