मुंगूल, फातोर्डा येथे ट्रक-टेम्पो ट्रॅव्हलरच्या धडकेत एकाचा मृत्यू, अनेकजण जखमी

मुंगूल, फातोर्डा येथे पश्चिम बगल रस्त्यावर (Mungul-Fatorda western bypass) टेम्पो ट्रॅव्हलरने पाण्याच्या टँकरला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
मुंगूल, फातोर्डा येथे ट्रक-टेम्पो ट्रॅव्हलरच्या धडकेत एकाचा मृत्यू, अनेकजण जखमी

पणजी : मुंगूल, फातोर्डा येथे पश्चिम बगल रस्त्यावर (Mungul-Fatorda western bypass) टेम्पो ट्रॅव्हलरने पाण्याच्या टँकरला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बगलरस्त्यावर मुंगुल येथे टँकरद्वारे झाडांना पाणी घालण्याचे काम सुरू होते. याचदरम्यान मागून आलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरने टँकरला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, टेम्पो ट्रॅव्हलरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याचे सांगण्यात येत आहे.

या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींच्या प्रकृतीबाबत तसेच अपघातातील मृत व्यक्तीची माहिती घेण्याचे काम सुरू होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Goa Police)  घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास सुरू आहे.

(बातमी अपडेट होत आहे.)

हेही वाचा
सर्व पहा