मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराचा उद्रेक; चार जणांची हत्या, मृतदेह मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर

बॉम्बस्फोटात सीआरपीएफचे तीन जवान जखमी; मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. त्यात आतापर्यंत चार जणांची हत्या करण्यात आली आहे. गंभीर घटना घडली असून, हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या तिघांचे मृतदेह मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानाबाहेर आणून ठेवण्यात आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
5 hours ago
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराचा उद्रेक; चार जणांची हत्या, मृतदेह मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर

मणिपूर : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. त्यात आतापर्यंत चार जणांची हत्या करण्यात आली आहे.  गंभीर घटना घडली असून, हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या तिघांचे मृतदेह मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानाबाहेर आणून ठेवण्यात आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Three killed in Manipur attack, bodies left outside CM’s bungalow. A fourth person died after he was shot during a musical programme on Sunday night, while three CRPF personnel were injured in a bomb blast.)

दरम्यान, रविवारी रात्री एका संगीत कार्यक्रमादरम्यान झालेल्या गोळीबारात आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे या घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या चार झाली आहे. याशिवाय, झालेल्या बॉम्बस्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) तीन जवान जखमी झाले आहेत.राज्यातील या सलग हिंसक घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर मृतदेह ठेवण्यात आल्याने या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

मात्र, या हल्ल्यांमागे वेगवेगळी कारणे सांगितली जात असली तरी,  नेमके कारण, हल्लेखोरांची ओळख आणि घटनांशी संबंधित इतर तपशील अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. राज्यातील परिस्थितीवर प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. परिस्थिती आणखी चिघळू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी ही आवश्यक त्या सूचना देेऊन एकूण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. 

हेही वाचा
सर्व पहा