मुलीला सरप्राईज देणे राहिले अधुरे : धारबांदोडा अपघातात दांपत्याचा चटका लावणारा मृत्यू

मुलीचा वास्को येथे असलेला कार्यक्रम पाहण्यासाठी आले होते गोव्यात; मुंबई येथे शिक्षण घेणाऱ्या मुलीचा वास्को येथे असलेला कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या बेंगळुरू येथील दाम्पत्याला दुर्गीणी - धारबांदोडा येथे अपघातात मरण आले. आपल्या मुलीला सरप्राईज देण्यासाठी आलेल्या आई-वडिलांच्या मृत्यूची वार्ता ऐकण्याची वेळ शिक्षण घेणाऱ्या मुलीवर आली.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
38 mins ago
मुलीला सरप्राईज देणे राहिले अधुरे : धारबांदोडा अपघातात दांपत्याचा चटका लावणारा मृत्यू

फोंडा : मुंबई येथे शिक्षण घेणाऱ्या मुलीचा वास्को येथे असलेला कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या बेंगळुरू येथील दाम्पत्याला दुर्गीणी - धारबांदोडा येथे अपघातात मरण आले. आपल्या मुलीला सरप्राईज देण्यासाठी आलेल्या आई-वडिलांच्या मृत्यूची वार्ता ऐकण्याची वेळ शिक्षण घेणाऱ्या मुलीवर आली. अत्यंत महत्वाचे म्हणजे अपघातात मृत्यू झालेली सिंधू मूर्ती ही महिला बेंगळुरू येथील मर्स‌िडिज कंपनीच्या उपव्यवस्थापक म्हणून नोकरी करीत होती. तर पती सुमन पॉल हे सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करीत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेंगळुरू येथील दाम्पत्याची मुलगी मुंबई येथील एका शिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहे. मुंबईतील शिक्षण संस्थेचा एक कार्यक्रम शनिवारी वास्को येथे होणार होता. त्या कार्यक्रमात दाम्पत्याची मुलगी सहभागी होणार होती.  आपल्या मुलीला सरप्राईज देण्यासाठी सुमन पॉल व सिंधू मूर्ती हे दाम्पत्य कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी बेंगळुरूहून वास्को येथे जात होते. पण गोव्याची सीमा ओलांडून काही किलोमीटर अंतरावर गेल्यावर त्यांना अपघाताला सामोरे जावे लागले. अत्यंत दुर्दैवी अंत झालेली सिंधू मूर्ती ही महिला मर्स‌िडिज कंपनीची उपव्यवस्थापक होती. अपघातात सापडलेली मर्स‌िडिज कार सुद्धा कंपनीने महिलेला दिली होती. त्याशिवाय सुमन पॉल यांनी बेंगळुरू येथील एका नामवंत कंपनीतून स्वेच्छा निवृत्ती घेऊन एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करीत होते.   

दुर्गीणी- धारबांदोडा येथे शुक्रवारी दुपारी मर्स‌िडिज कार व मालवाहू ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सुमन पॉल (५३, बंगलोर) व त्याची पत्नी सिंधू मूर्ती (४८, बेंगळुरू) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात सीमा रमेश शिक्के (५३, वास्को, मूळ बेंगळुरू) ही महिला जखमी झाली. जखमी महिलेवर गोमेकोत उपचार सुरु आहेत. तर मृत झालेल्या दाम्पत्याच्या मृतदेहची उत्तरीय तपासणी शनिवारी सकाळी मडगाव येथील इस्पीतळात करण्यात आली. त्यानंतर दोन्ही मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. निरीक्षक मेलविटो फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा पंचनामा करण्यात आला आहे.

हेही वाचा
सर्व पहा