गोव्यात ३८ सागर मित्रांच्या नियुक्तीसाठी अर्ज मागवले

गोवा सरकारच्या मत्स्य व्यवसाय संचालनालयाने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेखाली (PMMSY) कराराच्या तत्त्वावर ३८ सागर मित्रांची नियुक्ती करण्यासाठी अर्ज मागवले आहेत.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
गोव्यात ३८ सागर मित्रांच्या  नियुक्तीसाठी अर्ज मागवले

पणजी: गोवा सरकारच्या मत्स्य व्यवसाय संचालनालयाने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेखाली (PMMSY) कराराच्या तत्त्वावर ३८ सागर मित्रांची नियुक्ती करण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवारांची थेट मुलाखत २८ ऑक्टोबर रोजी सकाली १० ते दुपारी १ या दरम्यान दयानंद बांदोडकर मार्ग, पणजी येथील मत्स्य व्यवसाय संचालनालयाच्या कार्यालयात घेण्यात येणार आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना दर मह‌िन्याला १० हजार रुपये वेतन आणि ५ हजार रुपये अतिरिक्त प्रोत्साहन राशी मिळणार. कराराचा कालावधी १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत असणार. अर्जदारांचे वय ३५ वर्षांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. तसेच फिशरीज सायन्स, मरीन बायोलॉजी वा प्राणीशास्त्रात पदवी वा विज्ञान शाखेत बारावी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.

उमेदवारांना माहिती तंत्रज्ञानाचे आणि कोकणी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. उमेदवारांनी पूर्णपणे भरलेला अर्ज, रंगीत पासपोर्ट अाकाराचे फोटो आणि अर्जात दिलेल्या माहितीच्या पुराव्यासाठी लागणारी कागदपत्रे स्वसाक्षांकित प्रती घेऊन उपस्थित रहावे.

या कागदपत्रांनी उमेदवाराचे पू्र्ण नाव, सध्याचा व कायमचा पत्ता, राष्ट्रीयत्व, जन्मतारीख, शैक्षणिक आणि अतिरिक्त पात्रता, सक्षण प्राधिकरणाने दिलेला १५ वर्षे गोव्यात वास्तव्यास असलेले प्रमाणपत्र आणि रोजगार नोंदणी क्रमांक यांची माहिती असणे गरजेचे आहे. सर्व पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीला उपस्थित रहावे.

हेही वाचा
सर्व पहा