ड्रग्जतस्कर अटालाला शरण येण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश

सराईत ड्रग्जतस्कर यानिव्ह बेनाहिम उर्फ अटाला या इस्रायली नागरिकाला मेरशी येथील सत्र न्यायालयात १६ सप्टेंबरपर्यंत शरण येण्यास गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे. सत्र न्यायालयाच्या जामीन अर्ज फेटाळण्याच्या आदेशाला अटाला याच्या आव्हान अर्जानुसार उच्च न्यायालायाने वरील निर्देश दिले आहेत.


1 hours ago
ड्रग्जतस्कर अटालाला शरण येण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश

गोवन वार्ता प्रतिनिधी
म्हापसा : सराईत ड्रग्जतस्कर यानिव्ह बेनाहिम उर्फ अटाला या इस्रायली नागरिकाला मेरशी येथील सत्र न्यायालयात १६ सप्टेंबरपर्यंत शरण येण्यास गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे. सत्र न्यायालयाच्या जामीन अर्ज फेटाळण्याच्या आदेशाला अटाला याच्या आव्हान अर्जानुसार उच्च न्यायालायाने वरील निर्देश दिले आहेत.
शिवोली येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात न्यायालयाने आरोप निश्चितीचे आदेश दिल्यानंतर अटालाने दाखल केलेला जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता. तसेच आरोपीला न्यायालयासमोर शरण येण्याचा आदेश दिला होता. या आदेशाचे पालन न झाल्याने सत्र न्यायालयाने अटालाविरुद्ध दोनवेळा अजामीनपात्र अटक वॉरन्ट जारी केले होते.
बुधवार, ९ रोजी सत्र न्यायालयाच्या आदेशाला अटालाच्या आव्हान अर्जावर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. प्रथम न्यायालयात शरण या, त्यानंतरच अर्जावरील पुढील सुनावणी घेतली जाईल, असा आदेश न्यायालयाने यावेळी दिला. त्यामुळे अटाला याला आता न्यायालयासमोर शरण यावे लागणार आहे.

हेही वाचा
सर्व पहा