महागाई वाढल्याने गृहआधार, ‘दयानंद’चे वेतन वाढणार : मुख्यमंत्री

अर्थसंकल्पात दिलेल्या आश्वासनाची होणार कार्यवाही; प्रस्ताव अर्थ खात्याकडे : मोदींच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवासंकल्प’; महागाई वाढल्याने गृहआधार तसेच दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या पैशांमध्ये वाढ होणे स्वाभाव‌िक आहे. अर्थसंकल्पात मी आश्वासन दिल्याप्रमाणे योजनेच्या लाभाचे पैसे वाढणार आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
महागाई वाढल्याने गृहआधार, ‘दयानंद’चे वेतन वाढणार : मुख्यमंत्री

पणजी : महागाई वाढल्याने गृहआधार तसेच दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या पैशांमध्ये वाढ होणे स्वाभाव‌िक आहे. अर्थसंकल्पात मी आश्वासन दिल्याप्रमाणे योजनेच्या लाभाचे पैसे वाढणार आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचे महिन्याचे पैसे वाढवण्याची फाईल अर्थखात्याकडे आहे. योजनेचे ५०० रुपये एवढी रक्कम वाढू शकते.शेवटी निर्णय मुख्यमंत्री घेणार, अशी माहिती समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली. निवडणूक जवळ पोहोचल्याने विविध घोषणा तसेच प्रकल्पांचे उद्घाटन होत आहे. गणेश चतुर्थी पूर्वी तीन  सिलिंडर ‌मोफत देण्याच्या  उज्ज्वला योजनेची कार्यवाही सुरू झाली आहे. आणखी काही दिवसांनी गृहआधार तसेच दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या पैशांमध्ये वाढ होणार. विधानसभा अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या विनियोग विधेयकाला मान्यता मिळाली. त्यात विविध खात्यांसाठी १०६१.१५ कोटींची तरतूद केली आहे. त्यातून सरकार खर्च भागवणार आहे.

उज्ज्वला योजनेेचे जुने अर्ज ग्राह्य धरणार

उज्जवला योजनेचे आता नवे अर्ज आले आहेत. ज्यांनी पूर्वी अर्भ भरले आहेत, त्यांना पुन्हा अर्ज भरण्याची गरज नाही. तसेच ही योजना सुरूच राहणार. अर्ज संपले तरी ते परत उपलब्ध होणार,असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

पुरातत्व खात्याला ४४०० चौ.मी. जमीन

पुरावत्व खात्याला पणजीत ४४०० चौ. मी. जमीन देण्यासाठी मंत्र‌िमंडळाने मान्यता दिली. पुरातत्व खात्याला जमीन वापरणे आता शक्य होणार. चौथ्या जागतिक ‘ओशीयन सायन्स कॉंग्रेस’च्या प्रायोजकपदाच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

प्रधानमंत्र्यांच्या जन्मदिवसानिमित्त सेवा संकल्प अभियान

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्ताने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर पर्यंत गोव्यात सेवा संकल्प अभियानाखाली विविध कार्यक्रम होणार. आशीर्वाद का दिया, सपनो का भारत, नमो सेवा, आंगन मीलन सेवा, कहानी बदलाव की, वडनगर ते वाराणसी, सेवा मेरा योगदान, सेवा सेतू अभियान हे कार्यक्रम होणार. प्रत्येक कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणून मंत्र्यांची निवड करण्यात आली आहे. सर्व मंत्री, आमदार तसेच कार्यकर्ते सहभागी होणार. मंत्री, आमदार तसेच प्रमुखांची बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी सेवा संकल्प अभियानचा कार्यक्रम निश्चित केला.

हेही वाचा
सर्व पहा