वाळवंटी नदीत बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह अखेर सापडला

तुळशीमळ, पाडोशे-सत्तरी येथे वाळवंटी नदीत बुडालेल्या सुधीर नाडकर्णी (७० वर्षे) यांचा मृतदेह अखेर शोधमोहीमेनंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी नदीतून बाहेर काढला.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
वाळवंटी नदीत बुडालेल्या  व्यक्तीचा मृतदेह अखेर सापडला

वाळपई : तुळशीमळ, पाडोशे-सत्तरी येथे वाळवंटी नदीत बुडालेल्या सुधीर नाडकर्णी (७० वर्षे) यांचा मृतदेह अखेर शोधमोहीमेनंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी नदीतून बाहेर काढला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वाळपई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. उत्तरीय तपासणीनंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

नाडकर्णी हे आपल्या घराकडे जात असताना काल वाळवंटी नदीत पडून बुडाले होते. त्यानंतर अग्निशामक दल आणि वाळपई पोलिसांनी संयुक्तपणे काल शोधमोहीम सुरू केली होती पण अथक प्रयत्न करूनही मृतदेह सापडला नव्हता. आज बुधवारी अखेर जवानांना नाडकर्णी यांचा मृतदेह शोधण्यात यश आले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वाळपई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. वाळपई पोलीस यासंदर्भात अधिक तपास करीत आहेत. 

हेही वाचा
सर्व पहा