द. आफ्रिकेतील खाणप्रकल्पात ७२० कोटींची बेकायदेशीर गुंतवणुक; जारकीहोळी कुटुंबाच्या १८ ठिकाणांवर ईडीचे छापे

दक्षिण आफ्रिकेतील खाणप्रकल्पातील कथित ७२० कोटींच्या बेकायदेशीर परदेशी गुंतवणुकीप्रकरणी कर्नाटकचे मंत्री सतीश जारकीहोळी, त्यांच्या कन्या खासदार प्रियंका जारकीहोळी यांच्या बेळगावसह १८ ठिकाणी ईडीचे छापे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
1 hours ago
द. आफ्रिकेतील खाणप्रकल्पात ७२० कोटींची बेकायदेशीर गुंतवणुक; जारकीहोळी कुटुंबाच्या १८ ठिकाणांवर ईडीचे छापे

बेळगाव : दक्षिण आफ्रिकेतील लोहखनिज प्रकल्पातील कथित ७२० कोटी रुपयांच्या बेकायदेशीर परदेशी गुंतवणूक प्रकरणी सक्तवसूली संचालनालयाने धडक कारवाई केली. ईडीच्या पथकाने बुधवारी पहाटे ४ वाजल्यापासून कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, त्यांच्या कन्या तथा चिक्कोडी लोकसभेच्या काँग्रेस खासदार प्रियंका जारकीहोळी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी निगडीत ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकून व्यापक शोधमोहीम सुरू केली आहे.


Image


विदेशी मुद्रा व्यवस्थापन कायद्यांतर्गत (FEMA) सुरू असलेल्या या मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासासाठी बंगळुरू, बेळगावसह कर्नाटकातील तब्बल १८ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे.

बेळगाव आणि बंगळुरूतील तब्बल १८ ठिकाणी एकाच वेळी शोधमोहीम

केंद्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी बंगळुरू येथील सतीश जारकीहोळी यांच्या शासकीय व खाजगी निवासस्थानी अचानक धाडी घातल्या. विशेष म्हणजे, गोव्याच्या सीमेला लागून असलेल्या बेळगाव जिल्ह्यात खासदार प्रियंका जारकीहोळी, त्यांचे मेहुणे वाय. डी. मंजुनाथ आणि इतर नातेवाईकांच्या मालमत्तांवर एकाच वेळी ही शोधमोहीम राबवण्यात आली.


Jarkiholi brothers: The famous 5 with deep roots in Karnataka politics


तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, सतीश जारकीहोळी यांची बहीण लक्ष्मी आणि त्यांचा मुलगा राहुल यांनी दक्षिण आफ्रिकेतील एका लोहखनिज कंपनीत सुमारे ७२० कोटी रुपयांची बेकायदेशीर परदेशी गुंतवणूक केल्याचा आरोप आहे. या कंपनीत दक्षिण आफ्रिकेचे एक नागरिक संचालक आहेत. लक्ष्मी आणि राहुल यांच्याकडे उत्पन्नाचा कोणताही स्पष्ट किंवा अधिकृत स्रोत नसताना ही गुंतवणूक करण्यात आल्याचा संशय ईडीला आहे.Residence of Karnataka PWD Minister Satish Jarkiholi in Belagavi. याशिवाय, मंत्री सतीश जारकीहोळी यांनी अलीकडेच रवांडा (Rwanda) देशातील एका उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळाची भेट घेतली होती. रवांडामध्ये पर्यटन आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आयोजित या बैठकीत त्या देशातही गुंतवणुकीचे प्रस्ताव मांडण्यात आले होते. या सर्व बाबींची व्याप्ती लक्षात घेऊन ईडीचे अधिकारी परदेशी गुंतवणुकीशी संबंधित सर्व कागदपत्रांची तपासणी करत असून लक्ष्मी आणि राहुल यांची कसून चौकशी करत आहेत.



उत्पादन शुल्क घोटाळ्याशी निगडीत नाही, हे नवीन प्रकरण : ईडी 

यापूर्वी २६ जून रोजी ईडीने सतीश जारकीहोळी यांचे मेहुणे आणि बेळगाव येथे उत्पादन शुल्क विभागात सह-आयुक्त (Joint Commissioner) म्हणून कार्यरत असणारे वाय. डी. मंजुनाथ यांच्यावर उत्पादन शुल्क विभागातील १७८ कोटी रुपयांच्या अनियमिततेप्रकरणी कारवाई केली होती. त्या धाडीदरम्यान ईडीने दारूच्या दुकानांचे शेकडो परवाने, रोख रक्कम आणि परदेशी चलन जप्त केले होते.


Kumba achieves production, sales increases for 2025 full-year


मात्र, बुधवारची ही ताजी कारवाई उत्पादन शुल्क गैरव्यवहार प्रकरणाशी निगडीत नसून दक्षिण आफ्रिकेतील ७२० कोटींच्या संशयास्पद गुंतवणुकीच्या स्वतंत्र व नव्या प्रकरणाशी संबंधित असल्याचे ईडीच्या उच्चपदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले आहे. या संपूर्ण कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) तुकड्यांचा कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

कर्नाटक काँग्रेसचा केंद्र सरकारवर राजकीय सूडबुद्धीचा आरोप

या मोठ्या धाडसत्रानंतर कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेत केंद्रातील भाजप सरकारवर राजकीय सूडबुद्धीचा तीव्र आरोप केला आहे. गृहमंत्री प्रियंक खरगे यांनी टीका करताना म्हटले की, केंद्रातील भाजपला माहित आहे की त्यांचे कार्यकर्ते कर्नाटकात जिंकू शकत नाहीत, म्हणूनच ते आगामी २०२८ च्या विधानसभा निवडणुकांना आयकर विभाग (IT) आणि ईडीच्या माध्यमातून सामोरे जाण्याचा प्रयत्न करत आहेत.


Karnataka Congress unites behind Satish Jarkiholi amid ED raids


मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले की, या धाडीचे त्यांना अजिबात आश्चर्य वाटलेले नाही. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर आणखी धाडी पडतील आणि त्यांनी सर्वांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. भाजप दलित आणि मागासवर्गीय नेत्यांना लक्ष्य करत असून यावरून त्यांची हताशा दिसून येते, परंतु काहीही झाले तरी २०२८ मध्ये काँग्रेसच पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपला राज्यातील सक्षम दलित नेतृत्व सहन होत नसल्याचा आरोप केला. बी. नागेंद्र यांच्यानंतर आता जारकीहोळी कुटुंबाच्या माध्यमातून काँग्रेसला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा हा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. तसेच ज्येष्ठ नेते बी. के. हरिप्रसाद यांनी तपास यंत्रणांचा वापर विरोधी पक्षाच्या नेत्यांना घाबरवण्यासाठी केला जात असल्याचा दावा करत, खासदार प्रियंका जारकीहोळी यांच्या घरी जाण्यापूर्वी नियमानुसार लोकसभा अध्यक्षांची पूर्वपरवानगी घेतली होती का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

हेही वाचा
सर्व पहा