गोवा-कर्नाटक जंगलात शिकार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोघांना अटक

हस्तिदंत, कातडी जप्त; गोवा आणि कर्नाटकातील टोळीचा संबंध; यल्लापूर-शिर्शी येथे वन भरारी पथकाने कारवाई करत शिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात वन्यजीव अवशेष व इतर प्रतिबंधित साहित्य जप्त केले. त्यात हस्त‌िदंत, कातडी आणि इतर वस्तुंचा समावेश आहे. आणि दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले संशयित गोवा आणि उत्तर कन्नड परिसरातील जंगलांमध्ये शिकार करणाऱ्या टोळीशी संबंधित असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
गोवा-कर्नाटक जंगलात शिकार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोघांना अटक

यल्लापूर-‌शिर्श‌ि : यल्लापूर-शिर्शी येथे वन भरारी पथकाने कारवाई करत शिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात वन्यजीव अवशेष व इतर प्रतिबंधित साहित्य जप्त केले. त्यात हस्त‌िदंत, कातडी आणि इतर वस्तुंचा समावेश आहे. आणि दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले संशयित गोवा आणि उत्तर कन्नड परिसरातील जंगलांमध्ये शिकार करणाऱ्या टोळीशी संबंधित असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.

यल्लापूर-शिर्श‌ि परिसरात ही कारवाई करण्यात आली. संशयितांकडून मोठ्या प्रमाणात वन्यजीवांशी संबंधित प्रतिबंधित वस्तू जप्त करण्यात आल्याने वन विभागाच्या कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे. प्राथमिक चौकशीत अटक केलेले दोघे जण गोवा तसेच उत्तर कन्नड जिल्ह्यातील जंगलांमध्ये शिकारीच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या टोळीचा भाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या टोळीचे इतर सदस्य कोण आहेत, तसेच वन्यजीवांची शिकार करून त्यांची तस्करी केली जात होती का, याचा तपास वन विभागाकडून सुरू आहे. या कारवाईमुळे गोवा-कर्नाटक सीमाभागातील जंगलांमध्ये सुरू असलेल्या बेकायदा शिकारीवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. वन विभागाने या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक केला आहे.       

हेही वाचा
सर्व पहा