वाळपई : तुळशीमळ, पाडोशे येथे आपल्या घराकडे जाणाऱ्या कॉजवेवरून जात असताना सुधीर नाडकर्णी हे वाळवंटी नदीत पडल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात माहिती मिळताच अग्निशमन दल आणि वाळपई पोलिसांनी घटनास्थळी जाऊन शोध मोहीम सुरू केली.कॉजवेवरून जात असताना सुधीर नाडकर्णी वाळवंटी नदीत पडल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि वाळपई पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने शोधमोहीम हाती घेतली. नदीपात्रात त्यांचा शोध घेण्यासाठी बोटीचाही वापर करण्यात आला. घटनास्थळी बचाव पथकाकडून युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे.
(न्यूज अपडेट होत आहे.)


